Monday 4 October 2021

Rajashree Shahu maharaj

 महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले (१७ मार्च १८८४). राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थिदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. त्यांना राज्याधिकार (२ एप्रिल १८९४) प्राप्त झाला. तत्पूर्वी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला (१८९१). त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन कन्या झाल्या.

त्यांनी प्रशासन-यंत्रणेनची पुनर्ररचना करून भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आ. ब. लठ्ठे यांसारख्या बहुजन समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली. १८९७-९८ साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. तरुण शाहूंनी धैर्याने त्यांवर मात केली. १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला. तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला; त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले.

कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला (१८९९). कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने शाहूंचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले. लो. टिळकांनी ब्रह्मवर्गाची बाजू घेतल्याने प्रकरण इरेस पडले. शाहूंनी वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यांची व शंकराचार्यांची वतने जप्त केली. ब्रह्मवर्गाने हे प्रकरण व्हाइसरॉयपर्यंत नेले; पण शेवटी शाहूंचीच सरशी झाली. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गास त्यांच्याशी समेट करावा लागला, पण महाराष्ट्रातील ब्रह्मवर्ग शेवटपर्यंत त्यांच्या विरोधातच राहिला. कुलकर्णी-वतन बरखास्ती, सत्यशोधक जलशांना शाहूंचा पाठिंबा या बाबींमुळे तर हा विरोध वाढतच गेला.

वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून, भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णियांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही, अशी शाहूंची धारणा झाली होती. परिणामी ते म. फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. त्यांनी उघडपणे त्यांचे अनुयायीत्व स्वीकारले नसले, तरी सत्यशोधक तत्त्वांना त्यांचा पाठिंबा होता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक स्कूल' ची स्थापना केली आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र ‘क्षात्रजगद्‌गुरू' पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्चविद्याविभूषित तरुणास नेमले (१९२०). धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत हा एक अभिनव प्रयोग होता.

शाहूंनी आर्यसमाज व थिऑसॉफिकल सोसायटी या संस्थांनाही आश्रय दिला. वेदांवरील श्रद्धा व जातिभेदाला विरोध, या आर्यसमाजाच्या तत्त्वांमुळे त्यांनी स्वत:ला ‘आर्यसमाजी' म्हणून घोषित केले; तथापि त्याच्या ते आहारी गेले नाहीत. अर्यसमाजाच्या गुरुकुलाची स्थापना झाली. पुढे राजाराम कॉलेज आर्यसमाजाकडे चालविण्यासाठी दिले गेले.

बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला (१९१७). प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.

खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून शाहूंनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. शिवाय नासिक, पुणे, नगर, नागपूर इ. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या.

मागासलेल्या जातींत शिक्षणाबद्दल फारशी आस्था नसल्याने व त्याचे कारण शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी लाभण्याची शक्यता नसल्याने शाहूंनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील ५०% शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला. राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू हे हिंदुस्थानातील पहिले राज्यकर्ते ठरले. अस्पृश्यतेचे उच्चाटन हे शाहूंनी आपले जीवितकर्तव्य मानले. संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने, कचेऱ्या इ. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला. त्यासाठी अनेक वटहुकूम जारी केले (१९१८-१९). त्यांनी अस्पृश्यांना सरकारी नोकरीत घेतले. समाजातील तलाठ्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागा दिल्या. त्यांच्यापैकी अनेकांना माहूत, हूलस्वार, पोलीस, स्वत:चे मोटारचालक म्हणून नेमले. महार-वतन खालसा करून महारांची वेठबिगारीतून आणि गुन्हेगार मानल्या गेलेल्या जातींची ‘हजेरी' पद्धतीतून मुक्तता केली. फासेपारधी, कोरवी, माकडवाले यांसारख्या भटक्या व विमुक्त जातींना जवळ करून त्यांचे जीवन स्थिर केले. त्यांना आपले रक्षक म्हणून नेमले. खेड्यापाड्यांतील बलुतेदारांनाही त्यांच्या बलुतेपद्धतीतून मुक्त करून त्यांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केले (१९१८). जोगिणी व देवदासी प्रथेस प्रतिबंध करणार कायदा जारी केला (१९२०).

याच सुमारास शाहूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली (१९१९). बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी' मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला.

अस्पृश्यतेबरोबरच जातिभेदाशी शाहूंनी अखेरपर्यंत संघर्ष केला. आंतरजातीय विवाह हा जातिभेदावर रामबाण उपाय वाटून त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली (१९१८). स्वत: पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय (धनगर-मराठा) विवाह घडवून आणले. तसेच बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. घटस्फोटास व विधवापुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळांपासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी मंजूर केला (१९१९). मागासलेल्या वर्गांतील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली.

सामाजिक सुधारणांबरोबरच शाहूंनी शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यांसारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. शाहूंनी कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला. ‘शाहू मिल' ची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली. शाहूंनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात संस्थानचा कायापालट करणार उपक्रम ठरला. संस्थानी मुलखातील हे सर्वांत मोठे धरण बांधून त्यांनी आपले संस्थान सुजलाम्‌-सुफलाम्‌ करून टाकले. शाहूंनी ‘सहकारी संस्थांचा कायदा' करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली (१९१३).

शाहूंनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. अल्दियाखॉं, हैदरबक्षखॉं, भूर्जीखॉं, सुरश्री केसरबाई, गानचंद्रिका अंजनीबाई मालपेकर अशा अनेक गायक-गायिकांनी शाहूंच्या आश्रयाने अखिल भारतीय कीर्ती संपादन केली. त्यांनी अनेक नाटक कंपन्यांना व गुणी कलावंतांना आश्रय दिला. बालगंधर्व व संगीतसूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत शहूंनीच महाराष्ट्राला दिले. संगीत व नाट्यकलेच्या जोपासनेसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह) बांधले. त्याच्या शेजारीच खुल्या नाट्यगृहाचीही सोय केली. शाहूंच्या दरबारात आबालाल रहिमानसारखा महान चित्रकार कलावंत होऊन गेला. बाबूराव पेंटर, दत्तोबा दळवी प्रभृती चित्रकारांना त्यांचे प्रोत्साहन मिळाले. मल्लविद्येच्या प्रांतात शाहूंनी संस्थानासह सर्व देशांतील मल्लांना उदार आश्रय दिला. रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचे मैदान बांधले. त्यांच्या कारकीर्दीत कोल्हापूर ही ‘मल्लविद्येची पंढरी' बनली. खुद्द शाहू हे मल्लांचे मल्ल म्हणून प्रसिद्ध होते. यांशिवाय त्यांनी कोल्हापुरात साठमारी हा हत्तीचा खेळ सुरू केला. शिकार तर त्यांचा आवडीचा छंद होता. पट्टीचा शिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता.

शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी' पदवी बहाल केली (१९१९). त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसांत द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने (१९१८) ते खचून गेले, तशातच मधुमेहाने ते ग्रासले होते. अखेर मुंबई येथे त्यांचे वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले.

 

Monday 9 August 2021

Sources of Ancient India

 _*संस्कृत कवियों एवं लेखकों की रचनाएं*_

✍🍁✍✍✍✍🍁✍✍✍

          ★ *महाकाव्य.* ★

_________

1. _रामायण(7 काण्ड)_ - *महर्षि वाल्मीकि.*

2. _महाभारत (18 पर्व)_ - *वेदव्यास*

3. _कुमारसम्भवम (17 सर्ग)_ - *कालिदास*

4. _रघुवंशम (19 सर्ग)_ - *कालिदास*

5. _बुद्धचरितम (28 सर्ग)_ - *अश्वघोष*

6. _किरातार्जुनीयम (18 सर्ग)_ - *भारवि*

7. _शिशुपालवधम (20 सर्ग)_ - *माघ*

8. _नैषधीयचरितम (22 सर्ग)_ - *श्री हर्ष*

9. _जानकी हरणम_ - *कुमारदास*

10. _हरविजयम (50 सर्ग)_ - *रत्नाकर.*

11. _जाम्बवती - विजयम_ - *पाणिनी*

12. _महानन्दकाव्य_ - *पतञ्जलि*

13. _प्रयागप्रशस्ति_ - *हरिषेण*

14. _रामचरित_ - *अभिनन्द*

15. _सेतुकाव्य_ -मात्र गुप्त

16. _भारतमज्जरी_ - *क्षेमेन्द्र*

17. _श्रीकण्डचरितम_ - *मखक*

18. _राजतरंगिणी_ - *कल्हण*

19. _स्वर्गरोहणम_ - *कात्यायन*

20. _कादम्बरीसार_ - *अभिनन्द*


★ _*काव्यशास्त्र*_ ★ 


1. _नाट्यशास्त्र_ - *आचार्य भरत*

2. _काव्यादर्श_ - *दण्डी*

3. _ध्वन्यालोक_ - *आनन्द वर्धन*

4. _काव्यमीमांसा_ - *राजशेखर*

5. _दशरूपक_ - *धनंजय और धनिक*

6. _सरस्वतीकण्ठाभरण_ - *भोजराज*

7. _काव्यानुशासन_ - *हेमचन्द्र*

8. _नाट्य दर्पण_ - *रामचन्द्र*

9. _भावप्रकाशन_ - *शारदातनय*

10. _साहित्य दर्पण_ - *विश्वनाथ*

•••••••••••••••••••

    ✍🍁✍✍✍✍🍁✍✍✍✍✍


🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅

    ★ *गीतिकाव्य/खण्डकाव्य* ★

●●●●●●●●●●●●●●●●●●●●

1. मेघदूतम - *कालिदास*

2. अमरुशतकम - *अमरुक*

3. गीतगोविन्द - *जयदेव*

4. सुधालहरी - *जगन्नाथ*

5. जगदाभरण - *जगन्नाथ*

6. भामिनी विलास - *जगन्नाथ*

7. पवनदूत - *धोयी*

8. हंसदूत - *रुपगोस्वामी*

9. चंडी शतकम - *बाणभट्ट*

10. गाथा सप्तशती - *हाल

■■■■■■■■■■■■■■■■■

     ★   *कथासाहित्य*   ★

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

1. _पंचतंत्र_ - *विष्णु शर्मा*

2. ~हितोपदेश~ - *नारायण पण्डित*

3. _पुरूष परीक्षा_ - *विद्यापति*

4. ~भोजप्रबन्ध~ - *बल्लाल सेन*

5. _जातकमाला_ - *आर्यसूर*

6. ~कथा सरित्सागर~ - *सोमदेव*


★ *दर्शन ग्रन्थ* ★

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●


1. सांख्यसूत्र - *कपिल*

2. योगसूत्र - *पतंजलि*

3. न्यायसूत्र भाष्य - *वात्स्यायन*

4. तर्कभाषा - *केशव मिश्र*

5. वेदांत सार - *सदानन्द*

Saturday 5 June 2021

शिवचरित्र

 *"शिवचरित्र कोणते वाचावे ?", हा माझ्या व्हॉटसअॅप किंवा मेसेंजरवर हा सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे.* माझ्याप्रमाणेच माझ्या इतिहासप्रेमी मित्रांनाही हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या प्रश्नाचे एकदा सविस्तर उत्तर द्यावे, म्हणून हा लेख लिहित आहे; येथे शिवचरित्राशी निगडीत संदर्भग्रंथाच्या यादीसोबत काही ठराविक चरित्रांविषयी थोडक्यात माहितीही देत आहे; पण लेख वाचण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणे फार आवश्यक आहे.





१. शिवचरित्र हा अथांग महासागर आहे. त्यात अगणित शंख-शिंपले आहेत; मोती आहेत. ज्याला ते जसे गवसले, तसे ते त्याने दाखवले. कोणी स्वार्थापोटी त्याचा हवा तसा बाजार मांडला. एकाला दुसऱ्याची मते पटतीलंच असे नाही. पटले, तर चांगले आहे; नाही पटले, तर खुशाल पुढे जा !


२. इतिहासाशी निगडीत कोणतेही साहित्य वा संदर्भग्रंथ पहा. त्या कृतीच्या कर्त्याने आपल्या विधानास विश्वसनीय पुरावा दिला असेल, तरंच ते सत्य. अन्यथा त्याकडे संशयानेच पहावे लागेल.


३. कोणतेतरी एकंच पुस्तक वाचले आणि शिवचरित्र कळले असे मुळीच होत नाही. त्यामुळे 'सर्वोत्तम शिवचरित्र कोणते ?', असा प्रश्न विचारू नका ! एखाद-दुसरं पुस्तक वाचून शिवचरित्र कळणारंच नाही. किमान दोन वेगवेगळ्या इतिहासकारांनी लिहिलेली शिवचरित्रं तरी वाचायला हवीत. मी त्यासाठी श्री. बाबासाहेब पुरंदरे व श्री. गजानन मेहेंदळे या दोन इतिहासकारांचे नाव सुचवतो. किमान या दोन गुरुजनांनी लिहिलेली शिवचरित्रे प्रत्येक मराठी माणसाने वाचलीच पाहिजेत असे मला वाटते. यानंतर जर समकालीन साधने वाचणार असाल तर सोन्याहून पिवळे !


४. पाच-पन्नास पानांत आटोपलेली, चर्चांचं गुऱ्हाळ फिरवून मोठाले निष्कर्ष काढल्यागत ठाम विधानं करणारी काही गल्लाभरू पुस्तकं उपलब्ध आहेत. अशा पुस्तकांपासून व ती पुस्तकं वाचून शिवचरित्रावर लंबीचौडी व्याख्यानं देणाऱ्यांपासून सुज्ञ वाचकाने व शिवप्रेमींनी लांब राहिले पाहिजे.


५. कादंबरी, नाटके, चित्रपट, मालिका यातून साधननिष्ठ इतिहास समजत नसतो. अगदी कादंबरीकाराने पुस्तकाच्या शेवटी शंभर-सव्वाशे संदर्भग्रंथांची यादी जरी दिलेली असली, तरी त्यातून त्या कादंबरीतील हरएक वाक्य सत्यंच आहे असे होत नाही ! तेव्हा नाथमाधवांचे लिखाण, श्रीमान योगी, राजेश्री, छावा, संभाजी अशा कांदबऱ्या वाचून 'आपण शिवचरित्र वाचले' अशा धुंदीत राहू नका. केवळ आणि केवळ मनोरंजन एवढाच या साहित्यकृतींचा उद्देश आहे !


शिवचरित्रावरील आधुनिक संशोधनपर ग्रंथ

१. राजा शिवछत्रपती (पुर्वाध आणि उत्तरार्ध) - बाबासाहेब पुरंदरे

शिवचरित्रविषयक उपलब्ध पुराव्यांचा वापर करून बाबासाहेबांनी अतिशय रसाळ भाषेत हे चरित्र लिहिले आहे. शिवचरित्राचे मर्म जाणून बाबासाहेबांनी ते वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. या चरित्रात लालित्य आहे; पण ते चवीपुरतेच ! रसाळ आणि प्रवाही भाषेमुळे बऱ्याच वाचकांचा ही एक कादंबरीच आहे, असा गैरसमज होऊ शकतो; पण गेल्या काही वर्षांपासून या शिवचरित्रांच्या आवृत्त्यांमध्ये बाबासाहेबांनी त्यांच्या विधानांस कोणकोणते पुरावे आहेत, ते त्या त्या प्रकरणाच्या शेवटी स्पष्ट केले आहे. त्यामुळे चोखंदळ वाचकांना ते सहज अभ्यासण्यासारखे झाले आहेत व अभ्यासकांसाठी हे चरित्र एक महत्वाचे साधन ठरले आहे.

समकालीन साधने वा पुरावे अभ्यासण्याआधी शिवचरित्राशी पुरेशी ओळख असली पाहिजे, ती ओळख करून घेण्यासाठी हा ग्रंथ वाचलाच पाहिजे. प्रत्येकाला इतका अभ्यास करण्यासाठी वेळ देता येईलंच असे नाही, त्यांनी किमान शिवचरित्राचे मर्म जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ वाचलाच पाहिजे.




२. श्री राजा शिवछत्रपती (भाग १ व २) - गजानन मेहेंदळे

हे एक साधार व वस्तुनिष्ठ चरित्र आहे. या चरित्रात कोणत्याही प्रकारचे लालित्य लेखकाने प्रकर्षाने टाळले आहे. समजा, शिवचरित्रातील एखाद्या प्रसंगाचे पुरावे तुम्हाला हवे असतील, तर खुशाल हे पुस्तक काढून बसावे. त्या त्या प्रसंगाशी निगडीत सर्व विश्वसनीय पुरावे एका ठिकाणी मिळतील. एखादा पुरावा विश्वसनीय नसेल, तर तो का विश्वसनीय नाही; याचेही विवेचन लेखकाने केले आहे. मराठ्यांच्या इतिहासाचा ज्याला अभ्यास करायचा आहे, त्याने हे पुस्तक वाचलंच पाहिजे. दुर्दैवाने हे शिवचरित्र अपूर्ण आहे, पण पुढील भाग येत्या काही वर्षांत प्रकाशित होतील.




३. Shivaji his life and times - Gajanan Mehendale

मेहेंदळे यांनीच लिहिलेले हे इंग्रजी शिवचरित्र असून, ते संपूर्ण (१६३० ते १६८०) आहे.


४. शककर्ते शिवराय (खंड १ व २) - विजयराव देशमुख

हे शिवचरित्र साधार, तसेच सोप्या भाषेत लिहिलेले आहे. चरित्र वाचत असताना आपण एक प्रमाणित शिवचरित्र वाचत असल्याचा वाचकाला आनंद होतोच, शिवाय चरित्राची भाषा सोपी व रोचक असल्याने वाचक मुग्ध होतो. शिवचरित्रावरील उपलब्ध सर्वच साधनांचा विजयरावांनी लिखाणात समावेश केला आहे, तिथे साधनांची विश्वसनीयता फारशी गृहीत धरली नाही, ही या शिवचरित्राची एक मर्यादा मानावी लागेल.




५. Shivaji the Great vol. 1 to 4 - Dr Balkrishna

या शिवचरित्राची पहिली आवृत्ती १९३२साली आली होती. बाळकृष्ण यांनी परकीय साधनांचा वापर करून एक विस्तृत शिवचरित्र लिहिले आहे. हे चरित्र वाचायचे असल्यास सध्या डॉ. जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेले, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे उपलब्ध आहे, किंवा National digital library of India या वेबसाईटवर जुन्या आवृत्तीचे सर्व खंड पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत.




६. छत्रपती शिवाजी महाराज  (पुर्वार्ध आणि उत्तरार्ध)- वा. सी. बेंद्रे

वा. सी. बेंद्रे यांनी मराठ्यांच्या इतिहासलेखनात आपले अमूल्य असे योगदान दिले आहे. फ्रॅन्कॉइस व्हॅलेंटाईन या डच गृहस्थाच्या संग्रहातील छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र वा. सी. बेंद्रे यांनीच शोधले होते. गुरुवर्य बेंद्रे यांनी शिवचरित्रातील घटनांशी निगडीत उपलब्ध साधनांमधील उतारे जसेच्या तसे आपल्या चरित्रात ठिकठिकाणी दिले आहेत. विषयाशी ओळख, साधनांचा गोषवारा आणि शेवटी थोडक्यात निष्कर्ष असे या शिवचरित्रातील प्रकरणांचे साधारण स्वरूप आहे. नवखे वाचक थेट याच शिवचरित्राकडे वळल्यास हा ग्रंथ वाचणे कठीण वाटू शकते. त्यामुळे साधारण उपरोक्त एक किंवा दोन शिवचरित्रे वाचल्यावर मग या ग्रंथाकडे वळावे, असा एक सल्ला द्यावासा वाटतो.

बेंद्रे यांनी शिवशाहीचा चर्चात्मक इतिहास - साधनचिकित्सा (प्रस्तावना खंड) या नावाने लिहिलेला एक ग्रंथ प्रसिद्ध आहे. हा ग्रंथ मात्र प्रत्येक इतिहासाच्या अभ्यासकाने वाचलाच पाहिजे.




७. क्षत्रियकुलावंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र - कृ. अ. केळूसकर 

आधुनिक काळात लिहिलेले शिवाजी महाराजांचे सगळ्यात जुने पण साधार चरित्र म्हणता येईल. पण त्याकाळी फारसे संशोधन झालेले नसल्याने केळूसकर यांचा भर बखरींवर आहे. शिवाय या चरित्रावर आता प्रताधिकार (कॉपीराईट्स) नसल्याने काही प्रकाशकांनी यात मनाजोगते बदल करूनही हे पुस्तक छापल्याचे समजते. तेव्हा वाचकांनी पुस्तक तपासून घ्यावे किंवा जुनीच प्रत अभ्यासावी.


८. शिव-चरित्र निबंधावली 

भारत इतिहास संशोधक मंडळाच्या 'शिवचरित्र कार्यालयाने' प्रकाशित केलेला ग्रंथ ! अवघ्या चारशे पानांत शिवचरित्राची साधार व सुगम मांडणी दहा दिग्गज इतिहासकारांनी केली आहे. शिवचरित्राच्या कोणत्याही अभ्यासकांना या ग्रंथाकडे दुर्लक्ष करता येणार नाही.


९. Shivaji - Setumadhavrao Pagadi

 हे पुस्तक मराठीतही उपलब्ध आहे, ज्यांंना थोडक्यात शिवचरित्राचा आढावा घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी उत्तम आहे.


याशिवाय काही चरित्रांची नावे सांगतो -

१०. श्री. छत्रपती आणि त्यांची प्रभावळ - सेतुमाधवराव पगडी.

११. अशी होती शिवशाही - डॉ. अ. रा. कुलकर्णी.

१२. छत्रपती शिवाजी महाराज - प्र. न. देशपांडे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ.

१३. समरधुरंधर (डॉ. केदार फाळके यांच्या Shivaji's visit to Agra या पुस्तकाचा मराठी अनुवाद) - विद्याचरण पुरंदरे.

१४. Shivaji and his times - Jadunath Sarkar.

१५. The Grand Rebel - Dennis kincaid.

१६. युगप्रवर्तक शिवाजी महाराज यांचे चरित्र - वा. कृ. भावे.

१७. श्री शिवछत्रपती, संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना आराखडा व साधने - त्र्यं. शं. शेजवलकर



याशिवाय शिवाजी महाराजांचे प्रशासन कसे होते, राज्यकारभार तसेच शिवकालीन समाजजीवन यांचा अभ्यास करायचा असेल, तर पुढील काही ग्रंथ वाचलेच पाहिजेत -

१. शिवकालीन महाराष्ट्र - डॉ. अ. रा. कुलकर्णी.

२. Administrative system of Chhatrapati Shivaji (Relevence to Modern Management) - Dr Kedar Phalke.

३. शिवकालीन महाराष्ट्र - वा. कृ. भावे.

४. Administrative system of the Marathas - S. N. Sen 

५. Military system of the Marathas - S. N. Sen (या दोन्ही पुस्तकांचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे, पण तो तितकासा चांगला साधलेला नाही).

६. शिवाजीची राजनिती - भास्कर वामन भट. (शिवाजी महाराजांचा राज्यकारभार, राजकारण यांचे शुक्रनितीसारख्या प्राचीन ग्रंथाच्या चष्म्यातून केलेले अभ्यासनीय विवेचन यात पाहता येईल.)


काही इतिहासकारांनी मराठ्यांचा समग्र इतिहास लिहिला, त्यातूनही शिवचरित्रविषयक भाग अभ्यासू शकता -

१. मराठी रियासत (आठ खंड) - गो. स. सरदेसाई.

२. मराठ्यांचा इतिहास भाग १ ते ३ - अ. रा. कुलकर्णी, ग. ह. खरे.

३. A History of the Maratha People (vol. 1 to 3) - C. A. Kincaid, D. B. Parasnis

४. A History of the Mahrattas - James Grant Duff (मराठी अनुवाद - मराठ्यांची बखर, डेव्हिड कॅपोन)


शिवचरित्राशी निगडीत काही ठराविक साधनांची आता ओळख करून देत आहे.

समकालीन कागदपत्रे -

इतिहास अभ्यासाच्या सर्वात विश्वसनीय साधनांपैकी एक साधन म्हणजे ही कागदपत्रे होत. दरबारातील कामकाज, निवाडे, करार, इनामपत्रे, सनदा अशी अनेक प्रकारची कागदपत्रे अभ्यासासाठी वापरता येतात. पूर्वी आपल्या इतिहासकारांनी वणवण भटकून, पोटाला टाच मारून अशी कागदपत्रे भारतभर हिंडून मिळवली आणि प्रकाशित केली. असे काही ठराविक संग्रह इथे सांगत आहे.


१. मराठ्यांच्या इतिहासाची साधने - 

हे एकूण बावीस खंड वि. का. राजवाडे यांनी प्रकाशित केले आहेत. या बावीस खंडांचे विषय पुढीलप्रमाणे -

खंड १ - पानिपत प्रकरणाचे कागद

खंड २ - पेशवाई शकावली

खंड ३ - ब्रह्मेंद्रस्वामींची पत्रे इत्यादी

खंड ४ - निरनिराळ्या शकावल्या

खंड ५ - पेशवेकालिन पत्रे

खंड ६ - नानासाहेब पेशव्यांच्या कारकीर्दीतील पत्रव्यवहार

खंड ७ - काळे दफ्तर

खंड ८ - बावडेकर दफ्तर

खंड ९ - प्रभात मासिकातील लेख

खंड १० - सवाई माधवरावकालीन पत्रव्यवहार

खंड ११ ‌- चासकर दफ्तर

खंड १२ - रायरीकर दफ्तर

खंड १३ आणि १४ - रायरीकर आणि खासगीवाले दफ्तरातील निवडक कागद

खंड १५ - शिवकालीन जेधे इत्यादी घराणी

खंड १६ ते १९ - शिवकालिन घराणी (इतिहाससंग्रह)

खंड २० - शिवकालीन घराणी (भा.इ.सं.मं)

खंड २१ आणि २२ - शिवकालीन घराणी (इतिहास व ऐतिहासिक)

यापैकी खंड ८,१५,१६,१७,१८,२० व २१ हे खंड शिवचरित्राशी निगडीत आहेत. पुढे प्र. न. देशपांडे यांनी हे बावीस खंड पुनर्प्रकाशित करताना 'शिवकालीन' व 'पेशवेकालीन' खंड वेगळे केले. त्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे -




याशिवाय काही मराठी कागदपत्रे पुढील साहित्यांत पाहता येतील -

२. शिवचरित्र साहित्य खंड (एकूण १६ खंड)

३. सनदापत्रांतील माहिती

४. श्री संप्रदायाची कागदपत्रे

५. मराठी दफ्तर खंड ३

६. पुरंदरे दफ्तर खंड ३

७. Records of Shivaji Period

८. छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे - प्र. न. देशपांडे

९. शिवछत्रपतींची पत्रे खंड १ व २ - डॉ. अनुराधा कुलकर्णी (या पुस्तकांत शिवाजी महाराजांच्या अस्सल पत्रांची छायाचित्रेही पाहता येतील)

१०. शिवकालीन पत्रसारसंग्रह (३ खंड) - 

शं. ना. जोशी यांनी संपादित केलेले आणि 'शिवचरित्र कार्यालया'ने प्रकाशित केलेले हे तीन खंड म्हणजे संपूर्ण कागदपत्रं नसून शिवाजी महाराजांच्या चरित्राशी निगडीत जी काही मराठी, फारसी वा युरोपिय कागदपत्रे उपलब्ध होती, त्या सर्व पत्रांचे सारांश या खंडांत छापले आहेत. सोबत मूळ पत्रे कोठे प्रकाशित झाली आहेत, त्याचे संदर्भही दिल्याने ते पडताळून पाहणेही शक्य झाले आहे.


याव्यतिरिक्त शिवाजी महाराजांशी निगडीत इतर कागदपत्रे पुढील ग्रंथांत पाहता येतील.

११. इन्शा-इ-हफ्त-अंजुमन 

या ग्रंथात मिर्झाराजा जयसिंग याचा मुन्शी उदयनराज याने तयार केलेली पत्रे सात विभागात छापली आहेत. या सर्वच पत्रांचा आजवर संपूर्ण अनुवाद झालेला नाही. मात्र काही पत्रांचे मराठी भाषांतर 'समग्र सेतुमाधवराव पगडी खंड ३ (मोगल-मराठा संघर्ष)' मध्ये केले आहे, तर काही पत्रांचे इंग्रजी भाषांतर The military despatches of a seventeenth Century Indian General या ग्रंथात जगदिश नारायण सरकार यांनी केले आहे.


१२. खुतूत-इ-शिवाजी 

शिवाजी महाराजांशी निगडीत काही फार्सी पत्रे एका अज्ञात व्यक्तीने संकलित करून ठेवली आहेत. यातले 'जिझिया' विषयीचे पत्र तर संशयित मानले जाते. या पत्रांचा मराठी अनुवाद 'समग्र सेतुमाधवराव पगडी खंड ३ (मोगल मराठा संघर्ष)' यामध्ये केलेला आहे.


१३. ऐतिहासिक फारसी साहित्य (६ खंड) - संपादक, ग. ह. खरे

विविध घराण्यांतील फारसी कागदपत्रे व औरंगजेबाच्या दरबारचे अखबार या खंडांत  मुळ फारसी पाठासह छापले आहेत.


१४. Selected documents of Shahjahn's reign आणि Selected documents of Aurangzeb's reign, Selected Waquai of the Deccan

या ग्रंथांत हैदराबाद येथील 'सेंट्रल रेकॉर्ड्स ऑफीस' येथील फार्सी कागदपत्रे छापली आहेत.



समकालीन दरबारी इतिहास 

पूर्वी राजेरजवाड्यांच्या दरबारात लेखक,कवि यांस आश्रय असे. हे लेखक आपल्या धन्याचे चरित्र लिहित. यात अर्थातंच धन्याची स्तुती आणि शत्रूची नालस्ती केली जात असे, परंतू या नोंदी समकालीन असल्याने त्यास अतिशय महत्व आहे. असे काही ग्रंथ पुढीलप्रमाणे -

१. श्रीशिवभारत (संस्कृत) 

 शिवाजी महाराजांच्या दरबारातील 'कविन्द्र परमानन्द नेवासकर' याने हे पद्यमय चरित्र लिहिले आहे. दुर्दैवाने हे चरित्र संपूर्ण उपलब्ध झालेले नाही; परंतू उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर हे चरित्र वेळोवेळी विश्वासार्ह ठरले आहे. 

स. म. दिवेकर यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला असून, सध्या ते सर्वत्र उपलब्ध आहे. अलीकडे 'शिवभारत' नावाने काही व्यक्ती मुळ शिवभारत न छापता भलतेच काही छापून विकतात; असेही निदर्शनास आले आहे, तेव्हा पुस्तक पडताळणी करून घ्यावे.

(टिप - याच परमानन्दाच्या 'गोविन्द' या नातवाने आणखी एक पद्यमय चरित्र लिहिले आहे, ते 'अनुपुराण' किंवा 'परमानन्दकाव्य' म्हणून ओळखले जाते. याचा श्रीशिवभारताशी काहीही संबंध नसून, हे भाटकाव्य म्हणूनंच लिहिले आहे.)




२. आलमगीरनामा (फार्सी) 

हा औरंगजेबाच्या दरबारातील मिर्झा मुहम्मद काजिम याने लिहिलेला ग्रंथ असून, या ग्रंथातील शिवचरित्राशी निगडीत भागाचे मराठी भाषांतर 'शिवचरित्रवृत्तसंग्रह भाग ३'मध्ये ग. ह. खरे यांनी दिलेले आहे.


३. मआसिर-इ-आलमगिरी (फार्सी) 

औरंगजेबाच्या दरबारात काम करणाऱ्या साकी मुस्तैदखान याने औरंगजेबाचा मुलगा बहादुरशहा याच्या कारकिर्दीत हा इतिहास लिहिला आहे. याचा इंग्रजी अनुवाद जदुनाथ सरकार यांंनी केलेला आहे. मराठी अनुवाद 'शिवचरित्रवृत्तसंग्रह भाग ३'मध्ये ग. ह. खरे यांनी दिलेला आहे.


४. मुहम्मदनामा (फार्सी) 

मुल्ला जहूर इब्न जहूरी याने मुहम्मद आदिलशाहीच्या कारकिर्दीचा इतिहास (इ. स. १६५१पर्यंत) आदिलशाहाच्याच आज्ञेवरून लिहिला आहे. त्याचा इंग्रजी अनुवाद 'शिवाजी निबंधावली भाग २' मध्ये प्रा. भवद्दयाल वर्मा यांनी केला आहे. मराठी अनुवाद 'शिवचरित्रवृत्तसंग्रह भाग १'मध्ये ग. ह. खरे यांनी दिलेला आहे.


५. तारीख-इ- अली आदिलशाही (फार्सी)

दुसऱ्या अली आदिशाहाच्या कारकिर्दीचा (इ. स. १६६६पर्यंत) इतिहास त्याच्याच आज्ञेवरून नुरूल्लाह याने लिहिला आहे. मराठी अनुवाद 'शिवचरित्रवृत्तसंग्रह भाग २'मध्ये ग. ह. खरे यांनी दिलेला आहे.


६. नुस्रतीकृत अलीनामा (उर्दू) 

 या उर्दू काव्यात मुहम्मद नुस्रती याने अली आदिलशाहीच्या कारकिर्दीचा इतिहास (इ. स. १६६६ पर्यंत) लिहिला आहे. मराठी अनुवाद 'शिवचरित्रवृत्तसंग्रह भाग २'मध्ये ग. ह. खरे यांनी दिलेला आहे.


याशिवाय शिवकालाच्या आसपासचे वृत्तांत वा रचना सांगता येतील -

१.राधामाधवविलास (संस्कृत) 

जयराम पिंड्ये या समकालीन कविने हे काव्य लिहिले असून, काव्यात विशेषतः शाहजीराजांची माहिती आहे. इतिहासाचार्य राजवाडे यांनी हे काव्य संपादित केले आहे.


२. संकर्षण सकळकळेकृत शिवकाव्य (संस्कृत) - भारत इतिहास संशोधक मंडळाने मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे; परंतू तो दुर्मिळ आहे.


३. पर्णालपर्वतग्रहणाख्यान 

जयराम पिंड्ये या समकालीन कवीने शिवाजी महाराजांनी इ.स. १६७३ साली पन्हाळा जिंकल्याची हकीकत या ग्रंथात लिहिली असून, मराठी अनुवाद स. म. दिवेकर यांनी केलेला आहे. नुकताच हा ग्रंथ 'श्री शिवसमर्थ सेवा प्रकाशना'ने पुनर्प्रकाशित केला आहे.


४. श्रीशिवराज्याभिषेककल्पतरू (संस्कृत) 

निश्चलपुरी गोसावी या मांत्रिकाने हा लहानसा ग्रंथ लिहिला आहे. त्याचा मुळ उद्देश महाराजांच्या वैदिक राज्याभिषेकातील त्रुटी काढणे व तंत्रमार्गाचे समर्थन करणे हा होता. संस्कृत संहिता भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकात (वर्ष १०, अंक १) प्रकाशित झाली असून मराठीत संक्षिप्त माहिती शांं. वि. आवळसकर यांच्या 'रायगडाची जीवनगाथा' या पुस्तकात वाचता येईल.


५. श्री प्रतापदुर्गमहात्म्य (संस्कृत) 

श्री. रामचंद्र दिक्षित यांनी शिवाजी महाराजांच्या नातसुनेला शिवाजी महाराजांचा पराक्रम कथन केला. 'प्रतापदुर्गमहात्म्य' म्हणून ती कथा प्रसिद्ध आहे. हा ग्रंथ इ. स. १७४९, म्हणजे संभाजीपुत्र छत्रपती शाहू यांच्या हयातीतच लिहून पूर्ण झाला आहे.

(संपादक - डॉ. सदाशिव शिवदे, भाषांतर - स. मो. अयाचित)


६. सभासद बखर (मराठी) 

 कृष्णाजी अनंत सभासद हा शिवाजी महाराजांना समकालीन होता. त्याने राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून लिहायला घेतलेले हे शिवचरित्र इ. स. १६९७ साली लिहून पूर्ण झाले. म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या  सतरा वर्षांनी शिवचरित्र लिहून पूर्ण झाले आहे. ते 'सभासद बखर' म्हणून ओळखले जाते. त्यात कालक्रमाची काही प्रमाणात मोडतोड झालेली असली, तरी शिवचरित्रविषयक उपलब्ध बखरींपैकी ही सर्वात विश्वसनीय बखर आहे. ही बखर शं.ना. जोशी यांनी शिवाय र. वि. हेरवाडकर यांनीही संपादित केलेली उपलब्ध आहे.


७. शिवभूषण (हिंदी) 

भूषण या समकालीन कवीने शिवाजी महाराजांवर काव्ये रचली आहेत. हा ग्रंथ समकालीन असला, तरी ऐतिहासिकदृष्ट्या यास तितकेसे महत्व नाही. साहित्य व इतिहास अशा दोन्हीही विषयांची आवड असणाऱ्या व्यक्तींसाठी हा ग्रंथ निश्चितंच पर्वणी आहे. कवि भूषणाचे छंद मराठी अर्थासहीत वाचायचे असल्यास, पुढील तीन ग्रंथ वाचू शकता.

अ)शिवराज भूषण - दु. आ. तिवारी

ब) शिवभूषण - निनाद बेडेकर

क) शिवराज भूषण - डॉ. केदार फाळके


८. फुतूहात-इ-आदिलशाही (फार्सी) - फुजूनी अस्तराबादी

मराठी अनुवाद 'शिवचरित्रवृत्तसंग्रह भाग ३'मध्ये ग. ह. खरे यांनी दिलेला आहे.


९. फुतूहात-इ-आलमगिरी (फार्सी) - ईश्वरदास नागर

इंग्रजी अनुवाद जदुनाथ सरकार यांनी केला आहे. मराठी अनुवाद 'समग्र सेतुमाधवराव पगडी साहित्य खंड ३ (मोगल-मराठा संघर्ष)' मध्ये वाचता येईल.


१०. तारीखे दिल्कुशा (फार्सी) - भीमसेन सक्सेना

मराठी अनुवाद 'समग्र सेतुमाधवराव पगडी साहित्य खंड २(महाराष्ट्र आणि मराठे)' मध्ये वाचता येईल.


११. मुन्तखबुललुबाब ए महंमदशाही(फार्सी) 

औरंगजेबाच्या कारकिर्दीत मोगलांचा नोकर असलेल्या मोहम्मद हाशिम याचा मुलगा 'खाफीखान' याने हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथातील निवडक उताऱ्यांचे भाषांतर पुढील ग्रंथांत वाचता येईल -

इंग्रजी - History of India as told by its own Historians, Vol. 7 by Elliot and Dawson

मराठी - समग्र सेतुमाधवराव पगडी खंड ३ (मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध).


शकावल्या 

या प्रकारात इतिहासातील काही घटनांची तारीखवार नोंद ठेवलेली असते. शिवचरित्राशी निगडीत अशा काही शकावल्या पुढीलप्रमाणे -

१. जेधे शकावली 

शिवाजी महाराजांचे महाराजांचे एकनिष्ठ, शूर सरदार कान्होजी जेधे यांच्या घराण्यातील कागदपत्रांपैकी शकावली 'जेधे शकावली' म्हणून ओळखली जाते. हे शिवचरित्राचे एक विश्वसनीय साधन आहे. ही शकावली स्वतंत्ररित्या अ. रा. कुलकर्णी यांनी संपादित केली आहे. इंग्रजीतून Shivaji Souvenir (by G. S. Sardesai) या ग्रंथात प्रकाशित झाली आहे.

२. शिवापूर शकावली

३. सहा कलमी शकावली

४. चित्रे शकावली (मुळ फारसी , मराठी अनुवाद शिवचरित्रवृत्तसंग्रह भाग २)

५. शिवापूरकर दप्तरातली शकावली

६. पुणे देशपांडे (होनप) शकावली

या शकावल्यांचे पाठ शिवचरित्रप्रदिप (संपादक - द. वि. आपटे, स. म. दिवेकर) व ऐतिहासिक शकावल्या (संपादक - अविनाश सोवनी) ग्रंथांत वाचता येतील 



काही युरोपीय वृत्तांत, वर्णने व कागदपत्रे पुढील ग्रंथांतून वाचता येतील.

१. English records on Shivaji 

 ईस्ट इंडिया कंपनीच्या कागदपत्रांमधून शिवाजी महाराजांशी निगडीत काढलेले सुमारे एक हजार कागदपत्रं या द्विखंडी पुस्तकात छापली आहेत.

२. पोर्तुगीज कागदपत्रे किंवा पोर्तुगीज मराठा संबंधांचा अभ्यास पुढील ग्रंथांतून करता येईल -

मराठ्यांच्या इतिहासाची साधने - पोर्तुगीज दफ्तर खंड २ आणि ३

पोर्तुगीज मराठा संबंध - पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर

३. डच कागपत्रे डाग रजिस्टर व बाळकृष्ण कृत Shivaji the Great या ग्रंथांत पाहता येतील.

४. Foreign Biographies of Shivaji 

या पुस्तकात कॉस्मो दि गार्डा, अॅबे कॅरे, पीअर् दि ऑर्लीन्स अशा समकालीन किंवा त्या काळाच्या आसपासच्या व्यक्तींनी लिहिलेली शिवचरित्रे आहेत.

५ Travels in the Mogul Empire (1656 - 1668) 

फ्रॅन्कॉइस बर्निए या फ्रेंच प्रवाशाने हा वृत्तांत लिहिला आहे.

६.Travels in India 

 जीन बॅप्टिस्टे टॅव्हरनिए या फ्रेंच  प्रवाशाने हे प्रवासवर्णन लिहिलं आहे.

७. Storia do Mogor 

निकोलाओ मनुची या इटालियन प्रवाशाने लिहिलेलं हे प्रवासवर्णन आहे.याचा इंग्रजी अनुवाद उपलब्ध आहे. मराठी अनुवाद 'असे होते मोगल' या शीर्षकाने ज. स. चौबळ यांनी केलेला आहे, परंतू तो संक्षिप्त असून, काही भाग गाळलेला आहे.



काही उत्तरकालीन ग्रंथ वा बखरी 

१. मासिर-अल-उमरा

२. बसातीउस्सलातिन (मराठी अनुवाद - विजापूरची आदिलशाही, नरसिंह वि. पारसनीस; संपादक - वा. सी. बेंद्रे)

३. मल्हार रामराव चिटणीसकृत शिवछत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र

४. शेडगावकर भोसले घराण्यातील बखर (मराठी दफ्तर, रुमाल पहिला)

५. चित्रगुप्त बखर

६.९१ कलमी बखर

७. १०९ कलमी बखर

८. शिवदिग्विजय बखर

९. मराठी साम्राज्याची छोटी बखर





आतापर्यंत हा लेख वाचत असताना (किंवा न वाचताच येथपर्यंत पोहोचणाऱ्यांना) काही शंका पडत असतील, त्याची उत्तरे पुढीलप्रमाणे -

१. शिवचरित्राचा अभ्यास करण्यासाठी हे सर्वच ग्रंथ वाचले पाहिजेत का ?

या प्रश्नाचे उत्तर अर्थातंच 'हो' असे आहे. शिवाय ही एक किमान यादी आहे. यापुढेही संशोधनास वाव आहे. अलीकडे दोन-चार पुस्तके वाचून स्वत:स शिवव्याख्याते, शिवलेखक, शिवश्री म्हणवणाऱ्या ठेकेदारांचे तण उगवले आहे ! या ठेकेदारांनी शिवचरित्राचा खेळ करून ठेवला आहे. वास्तविक शिवचरित्राचा अभ्यास म्हणजे येड्यागबाळ्याचे काम नव्हे. 


२. एक महाराष्ट्रीय म्हणून मला शिवाजी महाराजांविषयी प्रेम आहे, शिवचरित्राविषयी आस्था आहे; पण इतका वेळ मी देऊ शकत नाही. मग मी कोणते शिवचरित्र वाचू ?

खाली फक्त पाच पुस्तकांची नावे देत आहे. शक्य झाल्यास यातील किमान पहिली दोन पुस्तके, किंवा एकतरी पुस्तक वाचावे.

राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे

Shivaji his life and times - Gajanan Mehendale

शककर्ते शिवराय - विजयराव देशमुख

छत्रपती शिवाजी - सेतुमाधवराव पगडी

अशी होती शिवशाही - अ. रा. कुलकर्णी


३. उपरोक्त विविध ग्रंथ मी यापूर्वी चाळले आहेत, बऱ्याच ग्रंथांत तपशीलात कमी-अधिक तफावत दिसते. असे का ? मग सत्य काय मानायचे ?

इतिहासाच्या अभ्यासासाठी जी साधने वापरली जातात, त्यांच्या विश्वसनीयतेची एक श्रेणी असते. ती अभ्यास करून ठरवावी लागते. त्यासाठी पुढील ग्रंथ अभ्यासा -

साधनचिकित्सा (शिवशाहीचा चर्चात्मक इतिहास) - वा. सी. बेंद्रे

श्री राजा शिवछत्रपती भाग २ - ग. भा. मेहेंदळे

समग्र राजवाडे साहित्य, प्रस्तावना खंड (राजवाडेंच्या ऐतिहासिक प्रस्तावना).

याव्यतिरिक्त बहुतांश साधने प्रकाशित करताना इतिहासकारांनी आपापल्या ग्रंथांसाठी चर्चात्मक प्रस्तावना लिहिल्या आहेत. त्यांचा अभ्यास करण्याची सवय लावून घ्या.


४. मला ट्रेकींगची, तसेच गडकिल्ल्यांवर फिरण्याची आवड आहे, मी कोणती पुस्तके वाचू ?

उपरोक्त संशोधनपर शिवचरित्रांच्या अभ्यासासाशिवाय विशेषतः गडकोटांवर लिहिलेल्या पुस्तकांपैंकी शां. वि. आवळसकर यांचे 'रायगडची जीवनगाथा', शिवाय प्र.के.घाणेकर, महेश तेंडुलकर, शिवाजीराव एक्के, डॉ. सचिन जोशी इ. अभ्यासकांची पुस्तके उपलब्ध आहेत, ती वाचू शकता.


बहुत काय लिहिणे. मीसुद्धा आपल्याप्रमाणेच या इतिहासपंढरीच्या वाटेवरचा एक सामान्य पांथिक आहे. आमचे अगत्य कायम असू देणे ही विनंती !


धन्यवाद !

Sunday 11 April 2021

महात्मा जोतिबा फुले

 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

*उद्योगपती आणि कार्यकारी संचालक* :

*महात्मा जोतीराव फुले*..............

(११ एप्रिल महात्मा जोतीराव फुले 

यांच्या जंयती निमित्ताने)................

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

महात्मा जोतीराव फुले यांनी स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून समाजकार्य केलं. ते *'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी'*चे [ *Pune commercial & contracting Company* ] कार्यकारी संचालक होते. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती, व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. या कंपनीने धरणं, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामं केली.


जोतीरावांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचं अद्याप पुरेसं लक्ष गेलेलं नाही.

जोतीराव हे स्वत:च्या तेलानं जळणारे सामाजिक कार्यकर्ते होते. वर्गणीवर समाजकार्य करण्याची प्रथा तोवर निर्माण झालेली नव्हती. स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून त्यांनी समाजकार्य केलं. ‘बिल्डर’ हा शब्द आज वेगळ्या अर्थानं प्रचलित झालेला आहे. त्याला ‘आदर्श’ रूप प्राप्त झाल्यानं तो वापरताना काळजी घ्यावी लागते. 


जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते. 

त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले वा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत.

*मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा,* आदींची बांधकामे सत्यशोधकांनी केलेली आहेत.

राजू बाबाजी वंजारी यांनी *मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या.* हे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि जोतीरावांच्या कंपनीचे भागीदारही होते.

त्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेलं आहे. 


*जोतीरावांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामं म्हणजे पुण्यातील कात्रजचा बोगदा,येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामं त्यांनी केली*.

त्यातून मिळविलेली रक्कम सामाजिक कामासाठी मुक्त हस्ते खर्चून टाकली.


जोतीरावांच्या या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचंही काम केलं जाई. बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिलं. जोतीरावांनी ते ‘जातीभेद विवेकसार’ प्रकाशित केलं. या कंपनीचं पुण्यात पुस्तकविक्री केंद्र होतं. तसेच सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सी जोतीरावांकडे होती. ही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे. एक अव्वल दर्जाचे यशस्वी व्यापारी, उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतीरावांचा नावलौकिक होता. सामाजिक कार्यकर्ता आणि यशस्वी उद्योगपती असा संगम फार विरळाच म्हटला पाहिजे.

कितीतरी मोठी कामं या कंपनीमार्फत त्यांनी केल्याच्या कागदोपत्री नोंदी मिळालेल्या आहेत.


१५० वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे, भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतिरावांचेच प्रोत्साहन होते.


ख्यातनाम विचारवंत डॉ. रामचंद्र गुहा यांनी जोतीरावांना आधुनिक भारताचे "शिल्पकार" मानलेले आहे. डा.बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरूस्थानी मानायचे आणि फुले यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू असे अभिमानानं सांगायचे. डॉ. जी.एस.घुर्ये आणि डॉ. एम.एन.श्रीनिवासन यांच्या अनेक वर्षे आधी महात्मा जोतीराव फुले यांनी भारतीय समाजाचं विशेषत: जातीव्यवस्थेचं ज्या पद्धतीनं शास्त्रीय विश्लेषण केलं होतं ते पाहता, जोतीराव हेच आद्य भारतीय समाजशास्त्रज्ञ ठरतात. त्यांचं हे लेखन आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे.


१९३२ साली पुण्यात बोलताना महात्मा गांधी म्हणाले होते, *"जोतीराव फुले देशके पहले महात्मा थे. असली महात्मा वोही थे."* सावरकरांनी फुल्यांना *"समाज क्रांतिकारक"* म्हणून गौरविले होते. तीन अगदी भिन्न वैचारिक छावण्यांमधील या नेत्यांनी फुल्यांचा गौरव केलेला आहे *आजच्या जागतिकीकरणाच्या संघर्षशील जिवनात असे काही फुल्यांकडून आपल्याला मिळण्याची शक्यता आहे काय?*

आणि *असल्यास किती आणि कोणत्या गोष्टी याचा विचार करायला हवा*


जोतीरावांनी सर्वांना शिक्षण,ज्ञाननिर्मिती, कौशल्यनिर्मिती, स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप, धर्मचिकित्सा आणि आंतरजातीय विवाह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचं काम केलं.

जोतीराव आयुष्यभर विनावेतन आणि विना मानधन पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते राहिले. 


नेल्सन मंडेला आणि बराक ओबामा भारत भेटीवर आलेले असताना आपण त्यांना फुले यांनी १८७३ साली [144 वर्षांपुर्वी ] लिहिलेल्या "गुलामगिरी" ह्या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद भेट दिला. ते दोघेही भाराऊन गेले. फुले यांनी हे पुस्तक निग्रोमुक्तीच्या चळवळीला अर्पण केलेले आहे. 

*संपुर्ण आशिया खंडातील हा एकमेव विचारवंत आहे की ज्यानं दिडशे वर्षांपुर्वी विचारांचं जागतिकीकरण केलेलं होतं.*

*---------------------*

प्रा. हरी नरके यांच्या लेखनातून संग्रहित 

*---------------------*

Wednesday 1 January 2020

Forwarded
*एका ब्राह्मणाचा दाबलेला इतिहास....*
ब्राह्मणद्वेषापायी आपल्या शाळेत कोणीतरी फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा काढली असे शिकवले जाते आणि खरा इतिहास लपवला जातो.
सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा काढण्यापूर्वी दोन वर्षे मुंबईमध्ये जगन्नाथ शंकरशेठ यांनी मुलींसाठी शाळा काढलेली होती या शाळेत सर्व जातीजमातीच्या मुलींना प्रवेश होता गेल्या २५० वर्षात भारतात अलौकिक चारित्र्याची व कर्तुत्वाची जी माणसे होऊन  गेली त्या सर्व मंडळीमध्ये जगन्नाथ शंकरशेठ यांचे इतका प्रचंड माणूस कोणीही दाखवता येणार नाही १८३२ साली त्यांनी Bombay Education Society काढली आणि पुढे एलीफेस्टॅन कॉलेज काढले १८४५ साली students literrary and scientific society ची स्थापना केली आणि स्वतःच्या घरात मुलींची शाळा काढली हि शाळा काढल्याबद्दल लोकांनी त्यांना सळो कि पळो करून टाकले Grant Medical College काढले मुंबई विद्यापीठ स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता पहिली भारतीय रेल्वे सुरु करण्यात नानांचा मोठा सहभाग होता स्त्रियांसाठी सूतिकागृहाची उभारणी केली ख्रिश्चन धर्माचे आक्रमण थोपवून धरले मुंबईत पहिली सूत गिरणी काढली मराठी व संस्कृत भाषण प्रतिष्ठा मिळवून दिली पुण्याची संस्कृत पाठशाळा बंद करण्याचा डाव उधळून लावला हि फक्त नानांची शैक्षणिक क्षेत्रातील कामे या व्यतिरिक्त प्रचंड कामे केली १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात क्रांतिकारकांना आश्रय दिला अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला मॉरिशसहून उसाचे बेणे आणून त्याची प्रथम लागवड केली Municipal Act पास करून घेवून BOMBAY Municipal council ची स्थापना केली पहिले Grand jury मध्ये त्यांचा समावेश होता Royal Asiatic Society चे जे प्रचंड ग्रंथालय आहे त्याच्या निर्मितीत त्यांचा मोठा सहभाग होता अस्पृशांच्या मुलांना समान वागणूक शाळांमधून मिळावी यासाठी त्यांनी चळवळ केली.
#परंतु जातीयवादी महाराष्ट्रात त्यांची महापुरुषात गणना होत नाही कारण ते *दैवज्ञ ब्राह्मण* आहेत.
*#मुंबईचे_शिल्पकार*
मुंबईने ज्यांना श्रीमंत केले असे लक्षावधी लोक आपल्याला सापडतील , पण आपल्या कर्तृत्त्वाने आणि दातृत्वाने ज्यांनी मुंबईला श्रीमंत केले असे अगदीच मोजके. नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ हे त्यातील अग्रगण्य नाव. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करत, नानांनी या मुंबईत चोख व्यापार केला. उदंड पैसे कमाविले आणि कमाविलेल्या या पैशाचे फक्त उंच इमले न बांधता त्यातून समाज घडविणाऱ्या संस्था उभ्या केल्या. नानांनी उभारलेल्या संस्था पाहिल्या की आजही आवाक् व्हायला होते. आज नानांच्या पुण्यतिथीनिमित्त, त्यांच्या या खऱ्याखुऱ्या श्रीमंतीचे मॉडेल समजून घेण्याचा केलेला हा प्रयत्न.
नानांचा काळ (१८०३-१८६५) हा इंग्रजाविरुद्ध सुरू झालेल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या आधीचा काळ. मुंबई हे शहर म्हणून आकाराला येण्याचा हा कालावधी. समुद्री व्यापारामळे हे शहर घडत होते आणि रोजगाराची संधी शोधण्यासाठी लोक या शहरात येत होते. नानांचे कुटुंब या अशा मुंबईत येणाऱ्या लोकामधील अगदी सुरुवातीला आलेल्यामधले लोक म्हणायला हवे. नानांचे पूर्वज बाबूलशेठ मुरकुटे अठराव्या शतकात कोकणातून मुंबईत आले. मुंबईच्या आघाडीच्या व्यापाऱ्यांमध्ये त्यांची गणना होत असे.
नानांचे वडील शंकरशेठजी ईस्ट इंडिया कंपनी व इंग्रजांचेही सावकार होते. सन १८०० मध्ये त्यांची एकूण संपत्ती १८ लाख रुपयांच्या घरात होती, असे संदर्भ सापडतात. नानांची आई लहानपणीच गेली. त्यामुळे वडिलांनीच त्यांना मोठे केले. त्यावेळच्या पद्धतीनुसार घरीच मास्तर येऊन नानांना भारतीय आणि इंग्रजी असे दोन्ही पद्धतीचे शिक्षण मिळाले. त्यामुळे मराठी, संस्कृत आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांवर नानांचे प्रभुत्व होते. या ज्ञानाचा उपयोग करून नानांनी आपला व्यापार यशाच्या शिखरावर पोहचविला.
ज्या शिक्षणाने आपण घडलो ते शिक्षण आज सर्वांना सहज उपलब्ध नाही, हे नानांनी जाणले होते. त्यासाठीच शिक्षण सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न नानांनी सुरू केले. देशातील मुलांना उत्तम शिक्षण मिळायला हवे यासाठी सुरू झालेल्या ‘नेटिव्ह स्कूल सोसायटी’ नावाच्या पश्चिम भारतातील पहिल्यावहिल्या शिक्षणसंस्थेचे नाना संस्थापक होते. याच संस्थेने पुढे मुलींच्या शिक्षणाचा आग्रह धरला. अर्थातच त्यावेळी त्याला सनातनी लोकांकडून विरोध झाला. नानांनी हा आपल्या अधिकाराने हा विरोध मोडून काढत आपल्या घरात मुलींची शाळा सुरू केली. आजही नानांची ही शाळा ‘स्टुडंट्स लिटररी अ‍ॅण्ड सायंटिफिक सोसायटी’च्या रुपाने गिरगावात आपले अस्तित्व टिकवून उभी आहे.
एखादा समाज किंवा शहर उभे राहते ते संस्थांच्या जोरावर. समाजातील संस्था जेवढ्या ताकदीच्या, तेवढा तो समाज बलवत्तर म्हणून ओळखला जातो. ऑक्सफर्डसारखे शहर तिथल्या विद्यापीठामुळे ओळखले जाते, तर न्यूयॉर्कमधला शेअर बाजार जगातील सर्वात मोठा ठरतो. या अशा संस्था शहरे घडवित असतात. हे नानांमधल्या दूरदृष्टीच्या शिल्पकाराने जाणले होते. म्हणूनच मुंबईच्या जडणघडणीच्या काळात नानांनी दीर्घकाळ टिकतील, समाजाला समृद्ध करतील अशा संस्थांच्या उभारणीकडे याकडे प्रामुख्याने लक्ष दिले. नानांचे हे संस्थाकारण आज पुन्हा एकदा समजून घ्यायची वेळ आली आहे.
१८१९ मध्ये माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन मुंबई इलाख्याचे गव्हर्नर झाले. नानांची आणि एलफिस्टन यांची ओळख झाली. एलफिस्टन यांच्या शिक्षणविषयक कामांमध्ये नानांनी त्यांना मदतीचे आश्वासन दिले. या दोघांच्या प्रयत्नातून १८२२ मध्ये ‘मुंबईची हैंदशाळा आणि शाळापुस्तक मंडळी’ची स्थापना झाली. सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण न्यायचे असेल, तर ते मातृभाषेतून दिले जावे याबद्दल दोघांचेही एकमत होते. त्यामुळेच मराठी, गुजराती व हिंदी भाषांमध्ये प्रथमच क्रमिक पाठय़पुस्तके छापली गेली.
*१८२७ मध्ये एल्फिन्स्टन इंग्लंडला परत जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांच्या सत्कारासाठी जो निधी गोळा केला गेला, त्यातून एल्फिन्स्टन कॉलेज सुरू झाले. याच एल्फिन्स्टन महाविद्यालयामधून दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे यासारख्या विद्वानांची पहिली पिढी तयार झाली. याच पिढीने नवे शिक्षण घेऊन समाजात नवा विचार रुजविला. या नव्या विचाराने पुढे काँग्रेसची स्थापना झाली आणि देशाचा स्वातंत्र्यलढा उभारला गेला. त्यामुळे आजच्या आधुनिक भारताची मुळे शिक्षणाच्या प्रसारात आणि नानांसारख्यांच्या दूरदृष्टीत आहे, हे विसरून चालणार नाही.*
*महिलांच्या शिक्षणाप्रमाणेच सतीच्या अमानुष प्रथेविरोधातही नानांनी आपला विरोध नोंदविला. सतीबंदीसाठी १८२३ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटकडे जो अर्ज करण्यात आला होता, त्यावर राजा राममोहन रॉय आणि जगन्नाथ शंकरशेठ यांच्या प्रमुख सह्या होत्या. या सतीबंदीमुळे मुंबई इलाख्यात सनातन्यांकडून काही प्रतिक्रिया उमटली तर नाना ते सांभाळून घेतील, यावर इंग्रजांचा विश्वास होता. म्हणूनच डिसेंबर १८२९ मध्ये लॉर्ड बेंटिकने सतीबंदीच्या* *कायद्यावर सही केली आणि हजारो वर्षांच्या क्रूर प्रथेचे उच्चाटन झाले. फक्त लोकानुनय करून नव्हे तर, प्रसंगी कटू वाटतील पण भविष्यवेधी असतील असे ठोस निर्णय समाजाच्या नेत्याला घ्यावे लागतात, हेच नानांच्या सतीबंदीच्या वेळच्या वागण्यातून स्पष्ट झाले.*
*१८४५ मध्ये एतद्देशीयांच्या भागीदारीने पश्चिम भारतात वाफेच्या बोटींचा पाया* *घालणारी ‘द बॉम्बे स्टीमशिप नेव्हिगेशन कंपनी’ उभारण्यात नानांचा पुढाकार होता. त्याच वर्षी जे. जे. रुग्णालय आणि ग्रँट मेडिकल महाविद्यालय, १८५१ मध्ये संस्कृतचे शिक्षण सर्वांसाठी खुले करणारे ‘पूना संस्कृत कॉलेज’ (आजचे डेक्कन कॉलेज), १८५५ मध्ये पहिले कायदा महाविद्यालय, १८५७ मध्ये मुंबई विद्यापीठ (बॉम्बे युनिव्हर्सिटी) आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, १८६२ मध्ये व्हिक्टोरिया गार्डन (आजची राणीची बाग) अशा महाकाय संस्थांच्या स्थापनेत नानांनी आपला सिंहाचा वाटा उचलला. याव्यतिरिक्त शासकीय मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय, मर्कटाइल बँक, सेंट्रल बँक ऑफ वेस्टर्न इंडिया सारख्या बँकांच्या उभारणीतही नानांनी प्रयत्न केले. एकंदरित या कालावधीत मुंबईत झालेल्या शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, आर्थिक बदलावर नानांनी आपला ठसा उमटविला.*
*१६ एप्रिल १८५३ रोजी आशियातील पहिली रेल्वे बोरिबंदर ते ठाणे अशी धावली. या रेल्वेसाठी नानांचे प्रयत्न महत्वाचे होते. म्हणूनच या पहिल्या रेल्वेप्रवासात जे काही मोजके मान्यवर होते, त्यात नानांचाही समावेश होता. एवढेच नव्हे तर बोरिबंदर स्थानकाच्या इमारतीवर (आजचे सीएसएमटी) आजही ज्या एकमेव भारतीयाचा पुतळा आहे, तो नानांचा. रेल्वेमुळे मुंबईत आधुनिकता धावू लागली आणि या शहराचा वेग प्रचंड प्रमाणात वाढला, हे कोणीच नाकारू शकत नाही.*
भारतीयांच्या समस्या इंग्लंडपर्यंत पोहाचाव्या यासाठी १८५१ मध्ये ‘बॉम्बे असोसिएशन’ नावाची पश्चिम भारतातील पहिली राजकीय संस्था स्थापन झाली. या संस्थेचे ‘प्रतिष्ठित’ अध्यक्ष म्हणून जमशेठजी जेजीभाई, तर अध्यक्ष म्हणून जगन्नाथ शंकरशेठ यांना निवडले गेले. या संस्थेतर्फे ब्रिटिश पार्लमेंटकडे सुधारणांसाठीचे अर्ज केले गेले आणि ते मंजूरही झाले. १८५७ च्या उठावात क्रांतिकारकांना मदत केल्याचा आरोप नानांवर झाला. त्यात नानांची चौकशीही झाली. पण काही पुरावे न आढळल्याने त्यांच्यावर कारवाई मात्र झाली नाही.
पुढे १८६१ साली लेजिस्लेटीव कौन्सिलमध्ये एतद्देशीय स्थान देण्याचे ठरले तेव्हा या परिषदेचा पहिले सदस्यत्व नानांनाच मिळाले आणि नाना अधिकृतरित्या भारतीयांचे प्रतिनिधी झाले. याच बॉम्बे असोसिएशनचे रूपांतर १८८५ मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये झाले. पुढे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या सभासदांनीच गोवालिया टँक येथे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली आणि स्वातंत्र्यलढ्याला अधिकृतरित्या सुरुवात झाली.
नानांच्या मालकीची प्रचंड मोठी जमीन मुंबईत होती. असे म्हणतात की आजच्या मरिन लाइन्स ते मलबार हिल परिसरात ही जमीन होती. नानांनी ही जमीन शहराच्या उभारणीसाठी दिली. त्यावेळी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची योग्य ती व्यवस्था शहरात नव्हती. नानांनी स्वतःची जमीन त्यासाठी दिली, अंत्यविधीसाठी लागणारी व्यवस्था तेथे लावून दिली. आजही त्याच नानांच्या मालकीच्या जागेवर मरिन लाइन येथील जग्गनाथ शंकरशेठ स्मशानभूमी उभी आहे.
नानांनी उभारलेले हे काम पाहिले की आपल्याला यासाठी एक जन्म पुरणार नाही असे वाटत राहते. पण नानांनी आपल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा आणि श्रीमंतीचा उपयोग समाजासाठी केला. जेवढे या शहराकडून घेतले, त्याच्या कैकपटीने या शहराला, समाजाला परत दिले. म्हणूनच नानांच्या या श्रीमंतीचा थोडा तरी अंश प्रत्येकाने घेतला तरी समाज म्हणून आपण खूप श्रीमंत होऊ.
*अशा  ह्या थोर पुरुषाला त्यांच्या १५४ व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन🙏*

Tuesday 17 December 2019

NRC आणि CAB किंवा आता CAA मधील फरक लक्षात घ्या आणि ते का आणावे लागले ते ही समजून घ्या ... "सिटीजन अमेंडमेंट बील" हे म्हणजे मुख्यतः पाकिस्तान आणि बांग्लादेश येथील शोषित अल्पसंख्याक (हिंदू,जैन,बौद्ध,पारशी,ख्रिश्चन) ज्यातले काही ऑलरेडी भारतात आश्रीत म्हणूण आलेले आहेत त्यांना मानवता म्हणूण आत घेणे (नागरीकत्व देणे) बास.... मग आता यात इथल्या मुसलमानांना त्रास होण्याचं काही कारण आहे का ?? संबंध च काय ??

आता NRC कडे वळूयात ..." नैशनल रजिस्टर सिटीजन" हे बिल अजून यायचंय तर यायच्या आधीच उलट सूलट चर्चा करुन माथी भडकावून, गैरसमज पसरवून भितीचं वातावरण तयार केलं जातंय ....तर हे बिल म्हणजे जे रोहींग्यां ,बांग्लादेशी, पाकिस्तानी नागरिक घुसखोरी करुन अवैध भारतात राहतायेत त्यांना शोधून काढणे आणि त्याना परत पाठवणे (कारण त्यांना ऑलरेडी आपण त्यांचे देश दिलेले आहेत हा त्यामागचा विचार) ....आता परत यात इथले नागरिक असणारे वर्षानुवर्षे इकडे राहणारे मुसलमानांना त्रास होण्याचं काही कारण आहे का ?? इथेही काही संबंध नाही.

मग का पेटलंय इतकं सगळं ...का इतका विरोध केला जातोय, तर मित्रांनो या मागचं षडयंत्र समजून घ्या ...या देशात कायमच मुस्लिमांना एका ठराविक वर्गाची (पक्षाची) भिती दाखवून त्यांची मतं घेतली गेलीयेत ...आम्ही सत्तेत आहोत म्हणूण तुम्ही सुरक्षित आहात हीच सत्ता जर उद्या भाजपच्या हाती गेली तर तुमचं काही खरं नाही ...ते तुम्हाला या देशाबाहेर हाकलणार अशी सतत एक हैमरिंग वारंवार केलं गेलंय, मानसिकता बनवली गेलीये आणि म्हणूनच आज कुठे जरा जरी खुट्ट झालं की लगेच बोंबाबोंब होते ...जे काय होतंय ते सगळं आमच्याच विरोधात चालू आहे अशी एक भावना मुस्लिम समाजाच्या मनात निर्माण होते ...

अर्थात मुस्लिम समाज ही काही इतका दुधखुळा नक्कीच नाही की कुणी घाबरवावे आणि यांनी घाबरावे ...ह्या भिती मागे त्यांची स्वतःची देखील एक मानसिकता आहे (१००% म्हणत नाही मी पण आहेत बहुतांश) त्यांनी कधी हा देश आपला मनापासून मानलाच नाही. सतत पाकिस्तान चा पुळका ..मग इकडे राहुनही इथल्या मातीशी एकरुप न होता मिळून मिसळून न राहता हा 'काफिर' तो 'मुश्रीक' असं ह्यांचं वागणं ...म्हणून मग अश्यांना भिती वाटणं ही सहाजिकच आहे.

पण मित्रांनो माझ्या सारख्या हिंदुस्थानी मुसलमानाच्या मनात किंचित ही भिती नाही ...आणि भिती असावी तरी का ?? कारण मला माहीतये माझ्यावर येणारं संकंट आधी स्वतः वर झेलणारी वेळप्रसंगी जीवाला जीव देणारी माझी मराठा, ब्राह्मण, शिख, जैन,मारवाडी, दलित मित्र माझ्या साठी उभे ठाकतील...माझ्या हक्का साठी आवाज उठवतिल ...मला उचलून कुणीही देशाबाहेर काढेल तेव्हा माझे हे मित्र गप्प बसतील का ?? कधीच नाही ...मग मी का घाबरु ?? का कुणाच्या ही सांगण्यावरुन ,भडकावण्यावरुन माझ्या च देशाच्या संसाधनांचं नुकसान करु ??

इतका मुर्ख मी नक्कीच नाही ....

एक उदाहरण देतो ...शाळेत दहावी ला असतांना मी शाळेतल्या क्रिकेट संघात होतो पण काही कारणास्तव मला संघातून ऐनवेळी काढून टाकण्यात आले ...त्या घटनेवरुन माझ्या वर्गातील इतर मित्र भडकली त्यांनी एकाच दिवसात एक दुसरा संघ तयार केला, मला कैप्टन बनवलं आणि घोषित केलं की आधीचा संघ आणि आता बनवलेला संघ यात एक सामना होईल आणि जो जिंकेल तो टुर्नामेंट खेळेल....सगळ्यांचीच तंतरली ऐनवेळी जर का हरलो तर अख्खा संघच बाद व्हायचा त्या पेक्षा इमरानलाच परत संघात घ्या असं ठरलं ....आता बाकीच्यांनी माझ्या साठी संघ तयार केला आणि आता मी यांना सोडून कसा जाऊ असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला ...तेव्हा ते ओळखून माझे ते मित्र मला म्हणाले इमरान वेडा आहेस का तु फक्त तुझ्यासाठी (तुझ्या वर अन्याय झाला म्हणून) आम्ही हे सगळं केलं आम्हाला खेळायचं नव्हतंच ...तु जा आणि खेळ, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी ....मग काय दहा हत्तींचं बळंच जणू माझ्या अंगात आलं ...ती टुर्नामेंट तर आम्ही जिंकलोच पण फायनल मैच मधे मी "मैन ऑफ द मैच"  होतो.

जे मित्र मला साध्या शाळेतल्या संघाबाहेर जाऊ देत नाहीत(कुणी मला संघातनं काढलेलं त्यांना सहन होत नाही)   ते मला जर उद्या कुणी ह्या देशाबाहेर काढू पाहत असतिल तर गप्प बसतिल का ??? 😊

इतका विषय साधा आहे मित्रांनो ....उगाच पराचा कावळा केला जातोय आणि तुम्ही बळी पडताय ...या मातीत डोकं टेकवता तुम्ही पाच वेळेस हीच माती डोक्याला लावा आणि निर्धास्त रहा ...कारण भित्यापोटी ब्रम्हराक्षस असतो हे ध्यानात ठेवा ....तुमच्या याच भितीचा फायदा उचलण्यासाठी टपून बसलेत काही जणं ...जाळपोळ, तोडफोड करायला तुम्हाला पुढे करणार आणि आपण मागून तमाशा बघणार ... कारण तुमच्या टोप्या आणि तुमच्या वेषभूषेवरनं तुम्ही पटकन ओळखू येताय .... सगळा देश बघतोय तुम्ही काय करताय ते.

एकीकडे लाखोंच्या संख्येने आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेला मराठा समाज बघा आणि तुम्ही करत असलेले हे भयानक चित्र बघा, काय मेसेज जातोय समाजात ??

छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार नसांनसांत भिणलेला मराठा समाज पानाच्या देठालाही धक्का लावत नाही आणि तुम्ही बसं जाळता?? रेल्वे जाळता ??? पोलिसांवर दगडफेक करता ?? 😢😢

खुपच दुखःद आहे हे ....वेळीच सावरा, कुणाच्या हातचं खेळणं बनू नका,बाकी कुणी करो न करो तुमच्या मनातली ही अनाहुत भितीच तुमचं फार मोठं नुकसान करणार आहे भविष्यात ....म्हणूण अजून वेळ गेलेली नाही परत फिरा

आणि अभिमानाने म्हणा होय आम्ही "हिंदुस्थानी मुस्लिम आहोत" हे आमचं घर आहे आणि निर्धास्त रहा तुमच्या घरातनं तुम्हाला कोणीही काढणार नाहीये.

मी "शेख इमरान" एक  हिंदुस्थानी मुस्लिम निर्धास्त, बिंधास्त माझं आयुष्य या देशात जगतोय आणि जगेन ...आणि ज्या देशात महाराष्ट्रातील एका छोट्याश्या खेड्यात माझे पणजोबा "अहमद शेख" (भाई मास्तर) आणि "नानासाहेब पाटील" यांच्या मैत्रीच्या आज ही शपथा खाल्ल्या जातात (ते जाऊन बराच काळ लोटल्यानंतर ही ) त्या देशात माझ्या व माझ्या परिवाच्या केसालाही धक्का लागणार नाही याची मला पुर्ण खात्री आहे किंबहुना तशी तिळमात्र ही शंका माझ्या मनात नाही 😊👍👍

#जय_हिंद_जय_भारत