Thursday 14 March 2019

जाणता राजा

https://youtu.be/--y1bPjUBCc

सुरेश भट यांच्या स्मरणार्थ

आज कविवर्य, गझलकार सुरेश भट यांची पुण्यतिथी अशा या महान शब्दप्रभूंना भावपूर्ण आदरांजली.💐🙏🙏

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते-
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते !

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या,
पाऊल कधी वार्‍याचे माघारी वळले होते ?

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी..
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते !

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही-
मी रंग तुझ्या स्वप्‍नांचे अश्रूंत मिसळले होते

घर माझे शोधाया मी वार्‍यावर वणवण केली-
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते !

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो..
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते !
              ✍सुरेश भट