Tuesday 17 December 2019

NRC आणि CAB किंवा आता CAA मधील फरक लक्षात घ्या आणि ते का आणावे लागले ते ही समजून घ्या ... "सिटीजन अमेंडमेंट बील" हे म्हणजे मुख्यतः पाकिस्तान आणि बांग्लादेश येथील शोषित अल्पसंख्याक (हिंदू,जैन,बौद्ध,पारशी,ख्रिश्चन) ज्यातले काही ऑलरेडी भारतात आश्रीत म्हणूण आलेले आहेत त्यांना मानवता म्हणूण आत घेणे (नागरीकत्व देणे) बास.... मग आता यात इथल्या मुसलमानांना त्रास होण्याचं काही कारण आहे का ?? संबंध च काय ??

आता NRC कडे वळूयात ..." नैशनल रजिस्टर सिटीजन" हे बिल अजून यायचंय तर यायच्या आधीच उलट सूलट चर्चा करुन माथी भडकावून, गैरसमज पसरवून भितीचं वातावरण तयार केलं जातंय ....तर हे बिल म्हणजे जे रोहींग्यां ,बांग्लादेशी, पाकिस्तानी नागरिक घुसखोरी करुन अवैध भारतात राहतायेत त्यांना शोधून काढणे आणि त्याना परत पाठवणे (कारण त्यांना ऑलरेडी आपण त्यांचे देश दिलेले आहेत हा त्यामागचा विचार) ....आता परत यात इथले नागरिक असणारे वर्षानुवर्षे इकडे राहणारे मुसलमानांना त्रास होण्याचं काही कारण आहे का ?? इथेही काही संबंध नाही.

मग का पेटलंय इतकं सगळं ...का इतका विरोध केला जातोय, तर मित्रांनो या मागचं षडयंत्र समजून घ्या ...या देशात कायमच मुस्लिमांना एका ठराविक वर्गाची (पक्षाची) भिती दाखवून त्यांची मतं घेतली गेलीयेत ...आम्ही सत्तेत आहोत म्हणूण तुम्ही सुरक्षित आहात हीच सत्ता जर उद्या भाजपच्या हाती गेली तर तुमचं काही खरं नाही ...ते तुम्हाला या देशाबाहेर हाकलणार अशी सतत एक हैमरिंग वारंवार केलं गेलंय, मानसिकता बनवली गेलीये आणि म्हणूनच आज कुठे जरा जरी खुट्ट झालं की लगेच बोंबाबोंब होते ...जे काय होतंय ते सगळं आमच्याच विरोधात चालू आहे अशी एक भावना मुस्लिम समाजाच्या मनात निर्माण होते ...

अर्थात मुस्लिम समाज ही काही इतका दुधखुळा नक्कीच नाही की कुणी घाबरवावे आणि यांनी घाबरावे ...ह्या भिती मागे त्यांची स्वतःची देखील एक मानसिकता आहे (१००% म्हणत नाही मी पण आहेत बहुतांश) त्यांनी कधी हा देश आपला मनापासून मानलाच नाही. सतत पाकिस्तान चा पुळका ..मग इकडे राहुनही इथल्या मातीशी एकरुप न होता मिळून मिसळून न राहता हा 'काफिर' तो 'मुश्रीक' असं ह्यांचं वागणं ...म्हणून मग अश्यांना भिती वाटणं ही सहाजिकच आहे.

पण मित्रांनो माझ्या सारख्या हिंदुस्थानी मुसलमानाच्या मनात किंचित ही भिती नाही ...आणि भिती असावी तरी का ?? कारण मला माहीतये माझ्यावर येणारं संकंट आधी स्वतः वर झेलणारी वेळप्रसंगी जीवाला जीव देणारी माझी मराठा, ब्राह्मण, शिख, जैन,मारवाडी, दलित मित्र माझ्या साठी उभे ठाकतील...माझ्या हक्का साठी आवाज उठवतिल ...मला उचलून कुणीही देशाबाहेर काढेल तेव्हा माझे हे मित्र गप्प बसतील का ?? कधीच नाही ...मग मी का घाबरु ?? का कुणाच्या ही सांगण्यावरुन ,भडकावण्यावरुन माझ्या च देशाच्या संसाधनांचं नुकसान करु ??

इतका मुर्ख मी नक्कीच नाही ....

एक उदाहरण देतो ...शाळेत दहावी ला असतांना मी शाळेतल्या क्रिकेट संघात होतो पण काही कारणास्तव मला संघातून ऐनवेळी काढून टाकण्यात आले ...त्या घटनेवरुन माझ्या वर्गातील इतर मित्र भडकली त्यांनी एकाच दिवसात एक दुसरा संघ तयार केला, मला कैप्टन बनवलं आणि घोषित केलं की आधीचा संघ आणि आता बनवलेला संघ यात एक सामना होईल आणि जो जिंकेल तो टुर्नामेंट खेळेल....सगळ्यांचीच तंतरली ऐनवेळी जर का हरलो तर अख्खा संघच बाद व्हायचा त्या पेक्षा इमरानलाच परत संघात घ्या असं ठरलं ....आता बाकीच्यांनी माझ्या साठी संघ तयार केला आणि आता मी यांना सोडून कसा जाऊ असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला ...तेव्हा ते ओळखून माझे ते मित्र मला म्हणाले इमरान वेडा आहेस का तु फक्त तुझ्यासाठी (तुझ्या वर अन्याय झाला म्हणून) आम्ही हे सगळं केलं आम्हाला खेळायचं नव्हतंच ...तु जा आणि खेळ, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी ....मग काय दहा हत्तींचं बळंच जणू माझ्या अंगात आलं ...ती टुर्नामेंट तर आम्ही जिंकलोच पण फायनल मैच मधे मी "मैन ऑफ द मैच"  होतो.

जे मित्र मला साध्या शाळेतल्या संघाबाहेर जाऊ देत नाहीत(कुणी मला संघातनं काढलेलं त्यांना सहन होत नाही)   ते मला जर उद्या कुणी ह्या देशाबाहेर काढू पाहत असतिल तर गप्प बसतिल का ??? 😊

इतका विषय साधा आहे मित्रांनो ....उगाच पराचा कावळा केला जातोय आणि तुम्ही बळी पडताय ...या मातीत डोकं टेकवता तुम्ही पाच वेळेस हीच माती डोक्याला लावा आणि निर्धास्त रहा ...कारण भित्यापोटी ब्रम्हराक्षस असतो हे ध्यानात ठेवा ....तुमच्या याच भितीचा फायदा उचलण्यासाठी टपून बसलेत काही जणं ...जाळपोळ, तोडफोड करायला तुम्हाला पुढे करणार आणि आपण मागून तमाशा बघणार ... कारण तुमच्या टोप्या आणि तुमच्या वेषभूषेवरनं तुम्ही पटकन ओळखू येताय .... सगळा देश बघतोय तुम्ही काय करताय ते.

एकीकडे लाखोंच्या संख्येने आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेला मराठा समाज बघा आणि तुम्ही करत असलेले हे भयानक चित्र बघा, काय मेसेज जातोय समाजात ??

छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार नसांनसांत भिणलेला मराठा समाज पानाच्या देठालाही धक्का लावत नाही आणि तुम्ही बसं जाळता?? रेल्वे जाळता ??? पोलिसांवर दगडफेक करता ?? 😢😢

खुपच दुखःद आहे हे ....वेळीच सावरा, कुणाच्या हातचं खेळणं बनू नका,बाकी कुणी करो न करो तुमच्या मनातली ही अनाहुत भितीच तुमचं फार मोठं नुकसान करणार आहे भविष्यात ....म्हणूण अजून वेळ गेलेली नाही परत फिरा

आणि अभिमानाने म्हणा होय आम्ही "हिंदुस्थानी मुस्लिम आहोत" हे आमचं घर आहे आणि निर्धास्त रहा तुमच्या घरातनं तुम्हाला कोणीही काढणार नाहीये.

मी "शेख इमरान" एक  हिंदुस्थानी मुस्लिम निर्धास्त, बिंधास्त माझं आयुष्य या देशात जगतोय आणि जगेन ...आणि ज्या देशात महाराष्ट्रातील एका छोट्याश्या खेड्यात माझे पणजोबा "अहमद शेख" (भाई मास्तर) आणि "नानासाहेब पाटील" यांच्या मैत्रीच्या आज ही शपथा खाल्ल्या जातात (ते जाऊन बराच काळ लोटल्यानंतर ही ) त्या देशात माझ्या व माझ्या परिवाच्या केसालाही धक्का लागणार नाही याची मला पुर्ण खात्री आहे किंबहुना तशी तिळमात्र ही शंका माझ्या मनात नाही 😊👍👍

#जय_हिंद_जय_भारत




Saturday 7 September 2019

कल 'साइंस' व 'सेल' नामक पत्रिकाओं में दो बहुप्रतीक्षित शोधपत्र प्रकाशित हुए। एक, राखीगढ़ी में मिले कंकाल के जेनेटिक अध्ययन और दूसरा दक्षिण व मध्य एशिया की जनसंख्या के जीनमैप पर। दोनों ने पहले के अध्ययनों के कई निष्कर्षों की पुष्टि की, मुख्यतः -
1. हडप्पा या सिंधु घाटी सभ्यता, जिसे अब इसके भौगोलिक विस्तार के कारण सिंधु सरस्वती सभ्यता भी कहा जाता है, में यूरेशियाई स्तेपी या ईरानी किसान समुदायों के जीन नहीं मिले। अर्थात इसके निवासी भारत में पहुंचे प्रथम मनुष्यों और कृषि के आरंभ पूर्व के पश्चिम एशियाई समूहों के मिश्रण थे। अतः इस सभ्यता ने कृषि व पशु पालन ईरान/पश्चिम एशिया से सीखने के बजाय इसका विकास स्वतंत्र रूप से किया था।
3. हडप्पा सभ्यता जितना अब तक माना जाता है उससे कहीं ज्यादा विकसित थी और इसका प्रभाव ईरानी जीरोफ्ट व मध्य एशियाई ऑक्सस सभ्यता तक विस्तृत था।
2. यूरेशियाई स्तेपी से भारोपीय भाषाएं बोलने वाले पशु पालकों का आगमन हडप्पा सभ्यता के बाद अब से 3500 - 4000 वर्ष पूर्व दौरान आरंभ हुआ था।
पर ये निष्कर्ष दक्षिणपंथियों के फिलहाल चल रहे छद्म प्रचार का भांडाफोड़ कर रहे थे। इसलिए अकादमिक जगत में कुंडली जमाये बैठे कुछ 'बुद्धिबेचों' ने फासिस्टी झूठ का अदभुत नमूना पेश किया। दोनों शोधपत्रों के इन स्पष्ट निष्कर्षों के बावजूद कुछ दक्षिणपंथी 'विद्वानों' ने कल सुबह ही एक प्रेस कॉन्फ्रेंस कर इन्हीं शोधों के हवाले से इसके ठीक विपरीत ऐलान कर दिया कि आर्य कहीं बाहर से नहीं आये थे, बल्कि हडप्पा सभ्यता के ही निवासी थे। इन्हीं निराधार झूठ घोषणाओं को मात्र दक्षीणपंथी साइटों ने ही नहीं, टाइम्स समूह सहित कई बडे अखबारों, साइटों ने भी बिना किसी जाँच-परख ज्यों का त्यों प्रकाशित कर दिया है।cpd

Thursday 1 August 2019

टिळक कोण होते?- प्रा. हरी नरके

आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची जयंती आहे. १ ऑगष्ट २०१९ पासून त्यांचे स्मृतीशताब्धी वर्ष सुरू होत आहे.
लोकमान्य टिळक हे आधुनिक भारतातले देशभर पोचलेले पहिले राष्ट्रीय नेते होते. एका मराठी माणसाने हे स्थान मिळवावे ही गौरवाची बाब होय. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक वर्षे तुरूंगवास भोगला. ते फार मोठे पत्रकार-संपादक-लेखक-विचारवंत होते. सार्वजनिक गणेशोत्सवाचे ते एक प्रवर्तक मानले जातात. त्यांची लोकप्रियता अफाट होती. त्यांना मंडालेच्या तुरूंगात पाठवण्यात आले तेव्हा मुंबईच्या गिरणी कामगारांनी बंद पाळला होता.

मात्र जहाल-मवाळ वाद, टिळक-आगरकर वाद, आधी सामाजिक की आधी राजकीय यावरचा वाद यांनी तसेच वेदोक्त व ताईमहाराज प्रकरण यातनं त्यांची प्रतिमा कट्टर सनातनी नेते अशी झाली. त्यांनीही ती आवर्जून जपली.

याविषयावरची " लोकमान्य व शाहू छत्रपती- य.दि.फडके," आणि "लोकमान्य ते महात्मा- सदानंद मोरे" ही पुस्तकं वाचनीय आहेत.

टिळक नेमके कोण होते? हा एक सार्वकालिक वादाचा विषय राहिलेला आहे. त्यांच्या मृत्यूला शतक लोटत असताना तरी दुषित पुर्वग्रह बाजूला ठेऊन त्यांच्याकडे निर्मळ मनाने बघता येईल का?

त्यांचा मुलगा श्रीधर हा सत्यशोधकांचा- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मित्र होता. त्याला सनातनी टिळक अनुयायांच्यामुळे आत्महत्त्या करावी लागली.

महर्षि वि.रा.शिंदे यांनी आयोजित केलेल्या अस्पृश्यता निर्मुलन परिषदेत टिळकांनी जोरदार भाषण केले मात्र "मी माझ्या खाजगी जिवनात अस्पृश्यता पाळणार नाही" या प्रतिज्ञापत्रांवर त्यांनी सही केली नाही. त्यांचे हे अस्पृश्यता निर्मुलन परिषदेतले जहाल भाषण त्यांनी लंडनच्या वर्तमानपत्रांमध्ये छापून आणले मात्र केसरीत त्यातला एक शब्दही छापू नये अशा सुचना दिल्या.

महात्मा जोतिराव फुले आणि टिळकांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी त्यांची मैत्री होती. टिळक-आगरकरांना पहिला तुरूंगवास झाला तेव्हा त्यांना जामिन द्यायला त्यांचा एकही सनातनी कार्यकर्ता पुढे आला नाही. अशावेळी महात्मा फुल्यांनी रातोरात रामशेट बापूशेट उरवणे ह्या सत्यशोधक समाजाच्या कोषाध्यक्षांमार्फत त्यावेळच्या दहा हजार रूपयांच्या जामिनाची व्यवस्था करवली. त्यावेळी सोन्याचा भाव एका तोळ्याला पंचवीस रूपये होता, तेव्हाचे दहा हजार रूपये म्हणजे आत्ताचे सव्वा कोटी रूपये होतात. हे रोख पैसे जोतीरावांनी रातोरात उभे केले.

ते तुरूंगातून सुटल्यावर त्यांचे जाहीर सत्कार फुल्यांनी घडवून आणले. त्यांना मानपत्रे दिली. हे सारेच टिळकांनी केसरीत ठळकपणे छापलेही, मात्र महात्मा फुले वारल्यावर त्यांच्या निधनाची एका ओळीचीही बातमी त्यांनी दिली नाही. खेदाची गोष्ट म्हणजे समाजसुधारक गोपाळराव आगरकरांनीसुद्धा आपल्या सुधारकात महात्मा फुले गेल्याची बातमी दिली नाही.

ही गोष्ट बाबासाहेबांनी लक्षात ठेवली. पुढे टिळक गेल्यावर मूकनायक मध्ये बाबासाहेबांनी अवघ्या एक ओळीची बातमी दिली. पुण्याचे टिळक गेले एव्हढेच बाबासाहेबांनी छापले. सनातनी पत्रकार भडकले. त्यावर "आम्हा बहुजनांच्या जिवनात टिळकांचे जेव्हढे स्थान होते तेव्हढी बातमी दिली. टिळकांनी तर फुल्यांची एव्हढीही बातमी दिली नव्हती." असा खुलासा त्यांनी केला.

मूकनायकची जाहीरात आम्ही छापणार नाही असे केसरीने कळवले होते. ज्याकाळात केसरीत चप्पल आणि जोड्यांच्या जाहीराती छापून येत असत त्याकाळात मूकनायकची जाहीरात छापायला आमच्या पेपरमध्ये जागा नाही असे अहंमन्य उत्तर दिले गेले.

केसरी हा भारतातला सर्वात लोकप्रिय पेपर असल्याची जाहीरात वारंवार केली जाते. केसरीचा सर्वाधिक खप जेव्हा होता तेव्हा केसरीच्या तीन हजार प्रती छापल्या जात असत.

महात्मा गांधी टिळकांना फार मानत असत. टिळक वारले तेव्हा गांधीजींना त्यांच्या पार्थिवाला खांदा द्यायचा होता.मात्र टिळकांच्या सनातनी अनुयायांनी त्यांस विरोध केला. कारण गांधीजी बनिया होते. ब्राह्मण नव्हते.

महात्मा फुल्यांनी सुरू केलेल्या शिवजयंतीचे श्रेय टिळक अनुयायांनी टिळकांना दिले. खरंतर फुल्यांनी पुण्यात शिवजयंती सर्वप्रथम सुरू केली. कामगार चळवळीचे जनक ना. मे.लोखंडे यांनी मुंबईत  ती पसरवली. त्याच्या बातम्या तेव्हाच्या दीनबंधूत अनेकदा आलेल्या आहेत. मात्र त्यानंतर अनेक वर्षांनी टिळकांनी ती आणखी मोठी केली. देशात अनेक ठिकाणी पोचवली.

टिळकांचे बहुतेक सर्व अनुयायी सनातनीच का होते? टिळकांचा बहुजनांना व स्त्रियांना शिक्षण द्यायला विरोध का होता? वेदोक्त प्रकरणात टिळक शाहूमहाराजांच्या विरोधात का वागले?

टिळकांनी आरक्षणाला का विरोध केला? टिळक जर अस्पृश्यता मानत नव्हते तर मग त्यांनी प्रतिज्ञापत्रावर सही का केली नाही? टिळकांनी आगरकर- न्या.रानडे- लोकहितवादी - गोखले या सार्‍या समाजसुधारकांना कायम विरोध केला.

सयाजीरावांनी पुण्यातला आपला गायकवाडवाडा टिळकांना दिला. मात्र पुढेमागे ब्रिटीशांचा जाच होऊ नये म्हणून खरेदीखताने तो दिल्याचे दाखवले. टिळकांच्या आत्ताच्या वंशजांनी काही वर्षांपुर्वी महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे नाव पुसून त्याचा केसरीवाडा केला.

प्रश्न अनेक आहेत.

- प्रा. हरी नरके, २३ जुलै २०१९

Monday 22 July 2019

नाईक सर यांना आदरांजली

|| श्रद्धा कुंभोजकर

आधुनिक महाराष्ट्र घडवणाऱ्या विचार, संस्था आणि व्यक्तींचा चिकित्सक शोध घेणाऱ्या इतिहास-ग्रंथाचा हा परिचय..

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात- १८१८ साली पेशवाईचा पाडाव झाल्यावर भारतात आणि अर्थातच महाराष्ट्रात इंग्रजी सत्ता दृढमूल झाली. यानंतर बऱ्याच काळाने १८८५ साली भारतीय राष्ट्रीय सभेची म्हणजेच काँग्रेसची स्थापना झाली आणि भारतीय स्वातंत्र्य लढय़ाला मूर्त रूप आले. परंतु हा स्वातंत्र्य लढा अचानक फोफावला नव्हता. त्याआधी राजा राममोहन रॉय यांच्यापासून पुढे अनेक भारतीय विचारवंतांनी येथील जनतेच्या मनात स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची स्वप्ने बीजरूपाने पेरली. त्यांना आधुनिक शिक्षण, संस्थात्मक जीवनाचा अनुभव, मुद्रणाच्या आणि दळणवळणाच्या सोयी अशा गोष्टींचे खतपाणी मिळाले. आणि मग भारतीय जनतेच्या स्वातंत्र्य लढय़ाचा वृक्ष काँग्रेस आणि इतर अनेक वैचारिक चळवळींच्या विस्तारातून आकाराला आला.

१९ व्या शतकातील या बहुमुखी घडामोडींमुळे आधुनिक भारताच्या इतिहासात या काळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेक भारतीय आणि परदेशी अभ्यासकांनी या काळातील ठळक घटनांवर तसेच उत्तुंग व्यक्तिमत्त्वांवर अभ्यास केले आहेत. तपशीलवार वर्णन करणाऱ्या अभ्यासांपासून ते या काळाच्या तुकडय़ाकडे वर्ग, जात, लिंगभाव, अर्थकारण; इतकेच काय, वैचारिक इतिहासाच्या चौकटीमधूनही विविध अभ्यासकांनी पाहिले आहे. त्यापैकी प्रा. ज. वि. नाईक हे आधुनिक भारताच्या इतिहासलेखनासाठी लागणाऱ्या मूळ संदर्भ-साधनांवर जबरदस्त हुकमत असणारे अभ्यासक म्हणून सुप्रसिद्ध आहेत. मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातून विभागप्रमुख म्हणून ते १९९३ मध्ये सेवानिवृत्त झाले. भारतीय इतिहास परिषद, महाराष्ट्र इतिहास परिषद, कोकण इतिहास परिषद अशा इतिहासकारांच्या प्रतिष्ठित संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. मुंबईतील शासकीय दफ्तरखान्यातील अस्सल कागदपत्रे अभ्यासून त्यांनी लिहिलेले संशोधननिबंध जगभरातील अभ्यासकांनी वाखाणले आहेत. परंतु विविध संशोधनपत्रिकांमध्ये १९७०-९० च्या दशकांत प्रसिद्ध झालेले हे संशोधन एकत्रित पुस्तकस्वरूपात उपलब्ध नसल्याने १९ व्या शतकातल्या महाराष्ट्राचा भारतीय दृष्टिकोनातून, पण इंग्रजी भाषेत लिहिलेला ग्रंथ सहजासहजी उपलब्ध नव्हता. ‘कलेक्टेड वर्क्‍स ऑफ जे. व्ही. नाईक’ हा प्रा. नाईक यांच्या २० निबंधांचा संग्रह प्रकाशित करून ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ने अभ्यासकांची आणि आधुनिक महाराष्ट्राबद्दल कुतूहल असणाऱ्या जिज्ञासू वाचकांची मोठी सोय केली आहे. मुरली रंगनाथन् यांची अतिशय अभ्यासपूर्ण आणि सहृदय प्रस्तावना लाभल्यामुळे या ग्रंथाचे संदर्भमूल्य आणखी वाढले आहे. सरधोपट पद्धतीने ग्रंथाची विभागणी न करता या काळातील विचार, संस्था आणि व्यक्तिमत्त्वांभोवती या ग्रंथाचे तीन भाग केले आहेत.

‘आयडिआज्’ या पहिल्या भागात या काळातील वैचारिक ताणेबाणे स्पष्ट करून दाखवले आहेत. इंग्रजी राज्यात काठीला सोने बांधून काशीला जाण्याइतकी सुरक्षितता असल्याने भारतीयांनी या नव्या सत्तेचे स्वागतच केले असा एक लोकप्रिय समज आहे. मात्र, ‘ब्रिटिश राजसत्तेच्या सुरुवातीच्या काही वर्षांतच या सत्तेचे शोषणकारी स्वरूप येथील विचारवंतांना जाणवले होते’ हे (सुप्रसिद्ध तर्खडकर बंधूंपैकी) भास्कर पांडुरंग यांनी ‘ए हिंदू’ या नावाने ‘बॉम्बे गॅझेट’ या दैनिकात १८४१ साली लिहिलेल्या आठ पत्रांच्या अभ्यासातून प्रा. नाईक यांनी स्पष्ट केले आहे. वृत्तपत्रीय पत्रलेखनातून शासनावर टीकेचे कोरडे ओढण्याची ही परंपरा लोकहितवादींच्या ‘शतपत्रां’नी आणि विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या ‘निबंधमाला’ने पुढे समृद्ध केली. वैचारिक इतिहास कसा लिहावा, याचा वस्तुपाठ म्हणता येईल अशा काटेकोर अभ्यासातून प्रा. नाईक दाखवून देतात, की या परंपरेचे मूळ इंग्लंडमध्ये ‘ज्युनिअस’ या पत्रलेखकाने १७६९-१७७२ या काळात- म्हणजे ‘निबंधमाला’च्या शंभर वर्षे आधी लिहिलेल्या पत्रांमध्ये आहे. इतकेच नव्हे, तर ‘आमच्या देशाची स्थिती’ या चिपळूणकरांच्या गाजलेल्या निबंधाचे शीर्षकदेखील ज्युनिअसच्या ‘स्टेट ऑफ द नेशन’ या पहिल्या लेखाच्या मथळ्याचे भाषांतर आहे!

इंग्रजी राज्य ही ‘दैवी देणगी’?

इंग्रजी राज्याच्या सुरुवातीच्या काळात ‘विद्यापीठाची स्थापना झालेली नसतानाही येथील विचारवंत जागतिक आणि प्रादेशिक घडामोडींची जाणीव राखून होते’- हा मुद्दा सिद्ध करताना प्रा. नाईक यांनी १९ व्या शतकातील ‘प्रभाकर’, ‘धूमकेतू’ आणि ‘ज्ञानदर्शन’ या मराठी नियतकालिकांचे मूळ अंक अभ्यासून त्यांचे संपादक भाऊ महाजन यांच्या पत्रकारितेचा अभ्यास मांडला आहे.

अनेक अभ्यासकांच्या मते, स्वातंत्र्याची आकांक्षा निर्माण होण्यापूर्वी महाराष्ट्रीय विचारवंतांना इंग्रजी राज्य ही ‘दैवी देणगी’ आहे असे वाटे. ही ‘दैवी देणगी’ची संकल्पना कुठून आली? तिचा स्वीकार डोळे मिटून केला गेला, की तिला विरोध केला गेला? अशा अनेक प्रश्नांचा धांडोळा घेऊन प्रा. नाईक दाखवून देतात, की इंग्रजांनी पदच्युत केलेल्या अभिजनवर्गाने ‘सर्वनाशे समुत्पन्ने र्अध त्यजति पण्डित:’ या न्यायाने तात्पुरत्या माघारीचा भाग म्हणूनच ‘दैवी देणगी’चा विचार मान्य केला होता. जहालपंथीयांनीच नव्हे, तर नामदार गोखलेंनी स्थापन केलेल्या ‘भारत सेवक समाज’नेदेखील या ‘दैवी देणगी’च्या संकल्पनेचा नंतरच्या काळात त्याग केल्याचे ते दाखवून देतात.

जहालपंथीयांचे मुकुटमणी लोकमान्य टिळक यांच्या एका अलक्षित श्रेयाचाही निर्देश प्रा. नाईक करतात. ते म्हणजे- ‘मराठा’ या वृत्तपत्रामधून कार्ल मार्क्‍सच्या लिखाणाचा येथील वाचकांना परिचय करून देणारे टिळक हे पहिले भारतीय होते. टिळकांनी खोती कायद्याच्या वेळी आपल्या पारंपरिक खोताच्या भूमिकेला न विसरता कुळांच्या ऐवजी खोतांची बाजू उचलून धरल्यामुळे त्यांच्या अभिजन प्रवृत्तीवर अनेक इतिहासकार टीका करतात. मात्र प्रा. नाईक यांची भूमिका अशी आहे, की टिळक हे काही एकाच भूमिकेत गोठलेले नेते नव्हते. भारतभर त्यांच्या नेतृत्वाला जसजशी मान्यता मिळत गेली तसतशी त्यांनी कामगार आणि शेतमजुरांच्या हिताचीही भूमिका स्वीकारायला सुरुवात केली होती. अमेरिकेत कृष्णवर्णीयांची गुलामगिरी नष्ट व्हावी यासाठी झटणाऱ्या थिओडोर पार्कर (१८१०-१८६०) या विचारवंताचा भारतीयांवरील प्रभावही ते स्पष्ट करतात. धर्म आणि धर्मचिकित्सा या दोन्हींच्या मंथनातून महाराष्ट्रातील प्रबोधन घडून आले, असे प्रा. नाईक यांचे प्रतिपादन आहे. या भागाचा जणू उपसंहार करणारा लेख एकंदर महाराष्ट्राने भारतीय स्वातंत्र्य लढय़ाच्या प्रत्येक टप्प्यावर दिलेल्या वैचारिक योगदानाचा अभ्यास मांडतो.

दोन अल्पजीवी प्रयोग

या विचारमंथनाला कारणीभूत ठरलेल्या विविध संस्थांचा अभ्यास ‘इन्स्टिटय़ूशन्स’ या दुसऱ्या भागात मांडला आहे. १८२३ साली स्थापन झालेल्या ‘गणित-शिल्प विद्यालया’चा अभ्यासक्रम, तेथील विद्यार्थी, त्यांची पाश्र्वभूमी आणि त्यांची प्रगती या सर्व गोष्टींचा अस्सल साधनांवरून अभ्यास करून प्रा. नाईक असे विश्लेषण मांडतात, की ‘मराठी माध्यमा’तून तंत्रशिक्षणाचा हा प्रयोग अतिशय फलप्रद होता. परंतु काही इंग्रजी अधिकाऱ्यांच्या इच्छेपुढे नाइलाज होऊन हा प्रयोग बाल्यावस्थेतच १८३२ मध्ये बंद केला गेला, आणि पुढच्या काळात मातृभाषेपासून तोडलेल्या इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली. असाच सामाजिक क्षेत्रात अल्पजीवी ठरलेला प्रयोग म्हणजे- ‘परमहंस सभा’! या सभेच्या पुरोगामी व जातविरोधी स्वरूपाची चर्चा करतानाच या सुधारणा काळाच्या पुढे होत्या हेही ते दाखवून देतात. काळाच्या पुढे असणाऱ्या संकल्पना मांडल्या जातात तेव्हा समाजाला त्या हास्यास्पद वा किरकोळ वाटतात. परंतु त्यातून अभिप्रेत असणारी सुधारणा ही मूलगामी स्वरूपाची आहे हे समाजाला कळत नाही. याचे प्रा. नाईक यांनी दिलेले मनोरंजक उदाहरण म्हणजे- परमहंस सभेचे सभासद असणाऱ्या रामचंद्र बाळकृष्ण यांनी १८६५ साली नेटिव्ह जंटलमन लोकांनी कुटुंबासमवेत सर्कस पाहण्यास उत्तेजन देणारा क्लब स्थापन केला होता! वरवर पाहता मनोरंजनासारख्या साध्या गोष्टीचा संदर्भ दिसला तरी, त्यामागे येथील सद्गृहस्थांनी आपल्या पत्नीसह सार्वजनिक ठिकाणी फिरावे, तिला समाजात प्रतिष्ठेचे, बरोबरीचे स्थान द्यावे यासाठी हा प्रयत्न होता, हे प्रा. नाईक स्पष्ट करतात.

केवळ तपशिलांच्या जंजाळात वाचकाला गुंगवणाऱ्या विद्वत्ताप्रचुर ग्रंथकारापेक्षा लहानात लहान बाबीचा अन्वयार्थ स्पष्ट करून इतिहासातील सौंदर्यस्थळे खरा इतिहासकारच दर्शवू शकतो. प्रा. नाईक यांनी हे आव्हान सहज पेलले आहे. मात्र तपशिलांकडे ते दुर्लक्ष करत नाहीत. स्वतंत्र भारताचे राष्ट्रीय बोधवाक्य झालेले ‘मुंडकोपनिषदा’तील ‘सत्यमेव जयते’ हे वचन सर्वप्रथम ‘प्रार्थना समाजा’ने बोधवाक्य म्हणून स्वीकारले होते, हे ते सिद्ध करतात. प्रार्थना समाजाच्या सदस्यांच्या माहितीचा संख्यात्मक अभ्यास करून त्यांनी हेही दाखवून दिले आहे, की सुधारणांची स्वप्नाळू इच्छा बाळगताना कोणताही ठोस सामाजिक कार्यक्रम न मांडल्यामुळे आणि सभासदांचे स्वरूप ‘उच्च जातवर्गीय उच्चशिक्षित तरुण पुरुष’ असेच राहिल्याने त्याचे स्वरूप ‘सत्यशोधक समाजा’सारखे सर्वसमावेशक होऊ  शकले नाही. परंतु सर्वसमावेशकतेच्याच जाहीर उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाचे स्वरूपही खरे तर फारसे समावेशक नव्हते हेही या अभ्यासातून स्पष्ट होते. मात्र प्रा. नाईक यांचे म्हणणे असे आहे : ‘या उत्सवातून हिंदू-मुस्लिमांत जातीय तणाव निर्माण झाला असे नसून, त्यात काही प्रमाणात का होईना, दोन्ही धर्माचे लोक भाग घेत असत.’

तिसऱ्या भागात डॉ. भाऊ  दाजी, रा. गो. भांडारकर, महात्मा जोतिराव फुले, गोपाळ कृष्ण गोखले आणि र. धों. कर्वे या विलक्षण व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास मांडलेला आहे. डॉ. भाऊ दाजी लाड यांचे संशोधक म्हणून असणारे अनन्यसाधरण महत्त्व प्रा. नाईक यांनी उजेडात आणले आहे. महारोगावर ‘खस्ता’ अथवा ‘कवटी’ नावाच्या वनस्पतीचा वापर करून भाऊ  दाजींनी औषध बनवले आणि त्याच्या वैद्यकीय चाचण्या होईपर्यंत ते प्रकाशित न करण्याचा वैज्ञानिकदृष्टय़ा सजगपणाही त्यांनी दाखवला. भारतविद्येच्या क्षेत्रात एशियाटिक सोसायटीसमोर त्यांनी अनेक शोधनिबंध सादर केले. व्हिक्टोरिया म्हणजेच आजचे जिजामाता उद्यान, तेथील संग्रहालय, कागद कारखाना, कापड गिरण्या, एकूणच मुंबईच्या आणि आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीतील त्यांचे भरीव योगदान प्रा. नाईक यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. मात्र इतिहासकाराने नायकाबाबत भक्तिभावाला दूर कसे ठेवावे, याचे प्रा. नाईक यांच्या लिखाणातील एक उदाहरण पूर्वगौरववादी इतिहासलेखनाच्या पाश्र्वभूमीवर उद्बोधक ठरते. भाऊ  दाजी यांच्या शिक्षकांनी लिहिलेल्या अस्सल नोंदींच्या अभ्यासावरून त्यांच्या शिक्षकांचे एक मत पुस्तकात उद्धृत केले आहे : ‘हा विद्यार्थी (डॉ. भाऊ दाजी) अभ्यासात फारसे लक्ष न देता इतिहास आणि भाषाविषयाच्या नावाखाली वेळ वाया घालवत आहे’!

महात्मा फुले, नामदार गोखले आणि र. धों. कर्वे यांच्या कर्तृत्वाचेही सुयोग्य ऐतिहासिक मूल्यमापन या भागात केले आहे. परंतु प्रा. नाईक यांच्या लेखणीला खरा बहर येतो तो इतिहासकारांनी काहीशा दुर्लक्षिलेल्या सर रा. गो. भांडारकरांवरील लेखामध्ये. भारतीय इतिहास आणि साहित्याभ्यासात भांडारकरांनी इतकी मोलाची भर घातली, की ते भारतीय आणि परदेशीही विद्वानांच्या प्रेमादरास पात्र झाले. त्यांच्या कर्तृत्वाचे प्रा. नाईक यांनी केलेले मूल्यमापन मुळातूनच वाचनीय आहे. प्रा. नाईक लिहितात : ‘भांडारकरांमधला विद्वान हा त्यांच्या ग्रंथांहून दशांगुळे अधिकच होता. त्यांनी दीर्घकाळ केलेल्या मनाच्या तपश्चर्येचे फळ म्हणजे एखादे पुस्तक नव्हते, तर त्यांचे पूर्ण व्यक्तिमत्त्वच होते. त्यांना आयुष्यात अनेक वेदना आणि कसोटय़ा सोसाव्या लागल्या. पण त्यांनी एखाद्या संताप्रमाणे स्थितप्रज्ञतेने आणि समत्वबुद्धीने आपला क्रूस पेलला होता.’

महाराष्ट्राच्या जडणघडणीच्या, आधुनिक होण्याच्या काळाबद्दल अस्सल संदर्भ-साधनांच्याच आधाराने लिहिलेले हे पुस्तक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या दृष्टीने अतिशय मौलिक आहे. इतिहासाच्या क्षेत्रात आज अधिकारवाणीने सांगितला जाणारा तथ्यात्मक इतिहास झपाटय़ाने लोप पावत आहे. व्यक्तिनिष्ठ, आत्मकेंद्री आणि ‘सत्योत्तर’कालीन वावटळीमध्ये ‘ह्य़ूमनाइझ, इक्वलाइझ, स्पिरिच्युअलाइझ’ या तत्त्वांना अनुसरून अर्थात मानवी चेहरा असणाऱ्या, समताधिष्ठित आणि नैतिकतावादी अशा काही विशिष्ट मूल्यांची जपणूक केली पाहिजे या जाणिवेतून लिहिले गेलेले असे इतिहासग्रंथ त्यामुळेच वेधक ठरतात.

‘द कलेक्टेड वक्र्स् ऑफ जे. व्ही. नाईक : रिफॉर्म अ‍ॅण्ड रेनेसान्स इन नाइन्टीन्थ सेन्च्युरी महाराष्ट्र’लेखक : जे. व्ही. नाईकप्रकाशक : एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईपृष्ठे : ३८०, किंमत : ७५० रुपये

shraddha@unipune.ac.in

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.

First Published on July 14, 2018 1:54 am

Web Title: The Collected Works Of Jv Naik Reform And Renaissance In Nineteenth Century Maharashtra

Wednesday 26 June 2019

*छत्रपती राजश्री शाहू महाराज*
(जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२),
कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे कोल्हापूर राज्याचे इ.स. १८८४-१९२२ दरम्यान छत्रपती होते. शाहू महाराज सुधारणावादी समाजसुधारक होते.

शाहू महाराज छत्रपती, राजर्षी
मराठा साम्राज्य - कोल्हापूर संस्थान
*अधिकारकाळ*
इ.स. १८८४ - इ.स. १९२२
*अधिकारारोहण*
एप्रिल २, इ.स. १८९४
*राज्यव्याप्ती* कोल्हापूर जिल्हा
*राजधानी* कोल्हापूर
*पूर्ण नाव* छत्रपती शाहू महाराज भोसले
*जन्म* जून २६, इ.स. १८७४
लक्ष्मी-विलास राजवाडा, कागल
*मृत्यू* मे ६, इ.स. १९२२ मुंबई
*पूर्वाधिकारी* छत्रपती शिवाजी महाराज (चौथे शिवाजी)
राजाराम ३ उत्तराधिकारी
छत्रपती राजाराम भोसले
*वडील* आबासाहेब घाटगे
*आई* राधाबाई
*पत्नी* महाराणी लक्ष्मीबाई भोसले
*राजघराणे* भोसले
*राजब्रीदवाक्य* जय भवानी


*राजर्षी शाहू महाराज*
शाहू महाराजांचा जन्म जून २६, इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे जयसिंगराव (आप्पासाहेब), आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. एप्रिल २, इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे मे ६, इ.स. १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.

*कार्य*
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी [ संदर्भ हवा ] त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले.

‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.

त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.

स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात "महाराजांचे महाराज‘ असा गौरव होतो.

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यातला. आज शाहूंची जयंती. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. राजर्षी शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी फार तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. एवढेच नाही तर ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.

अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले.

मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करुन संबंधत अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली.

त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची अतिशय विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करुन ही पद्धत बंद पाडली. जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.

तत्कालीन परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वणवण भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.

गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करुन समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.

राजषी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.

महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली.

*जातिभेदाविरुद्ध लढा*

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.

वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रखर झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.

*इतर कार्ये*
शाहू छत्रपती स्पिनिंग अॅन्ड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. राजांनी त्याकाळी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यात रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी राधानगरी नावाचे धरण बांधले.

*कलेला आश्रय*
राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले.

*स्वातंत्रलढ्यातील योगदान*

महाराजांनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली.

पारंपिरिक जातिभेदाला विरोध
संपादन करा
शाहू महाराजानी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करून महाराजांना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले. पण शत्रूंचे सारे प्रयत्न विफल ठरले.
*************************************
  विजय सर
                        मुख्याध्यापक
               z..p. school Ghot...
               
**************************************

Wednesday 12 June 2019

🎯

*घोडं दिसलं कि पायी चालू वाटत नाही*

" फ्लाईटनेच जायचं गं आई , ट्रेन मधे बोअर होतं मला"

आता सुट्टीत काकाकडे दिल्लीला जायचं अन् सिमला मनाली ट्रिप करून यायचं , असं ठरवत असताना , दुसरीतल्या सईने ठणकावून आपलं मत सांगितलं , अगं आज्जी आजोबांना ट्रेन बरी वाटते अन् राजधानी आहे ती चांगली .. एका रात्रीत पोचूही .. चारूता सारं सांगत राहिली तरी काही पटली नाही सईला .. मागे केरळला मग फ्लाईटने का गेलो ? ते  रेल्वे स्टेशन किती घाण असतं .. नाही म्हणजे नाहीच , फ्लाईटनेच जायचय मला ..

"ओरडायला हवं होतं मी तेंव्हाच खरं .. " रात्री चैतन्य ला चारू सांगत होती.  ओरडायला हवं होतं का रे ? पण खरं सांगू , कळतच नाहीये , चूक तिची कि आपली ? मागण्या आता वाढतच चालल्या आहेत तिच्या ..  फ्लाईटने जाणं किती सहज साध्य वाटतय तिला ..

बोर्नव्हिटा नसेल तर दूध नको , गाडी नसेल तर प्रवास नको , हाँटेलात गेलो तर चायनिजच हवं अन् माँलमधलं सारं काही घरी यायलाच हवं.. एक ना दोन .. जास्तच लाड करतोय का आपण ? चारूता च्या विचारांनी परत एकदा उचल खाल्ली.

हमम .. खरय तुझं  ..नेहमीप्रमाणे  कुस बदलत एवढच म्हणत चैतन्य झोपून गेला.

पन्नास पैशाच्या लिमलेटच्या गोळीचं आकर्षण असायचं आपल्याला .. कोणी कधी शाळेत वाढदिवसाचं वगैरे म्हणून चाँकलेट दिलच तर घरी येऊन अर्ध अर्ध करून खायचो ..

गरीब वगैरे काही कधी नव्हती परिस्थिती पण पैसा असा इतका सहज संपवत नव्हतो  , आता मध्यमवर्ग असा काही राहिलाच नाही की काय ...

मुबलकता आली .. पगार वाढले .. जाहिरात क्षेत्राने व्यापूनच टाकलंय आयुष्य अवघं .. जाहिरातींचा मारा होत राहतोय .. पगार त्याकडे वळत राहतोय ..

दिवाळीलाच कपडे घ्यायचो आधी नवे .. आणि एखादा वाढदिवसाला .. जुने झालेले ड्रेस आधी घरात वापरले जायचे अन् मग पायपुसणं बनून पायाखाली यायचे..

आणि परवा साडेसातशे रूपयांचा नाईट ड्रेस घेतला आपण .. सहज ..  आवडला म्हणून ..  आणि मग.. सईला काय म्हणा .. आपणच बदललो नाहीयोत का ?

संध्याकाळी  खेळून आल्यावर भूक लागली तर केळं , दूध पोहे गेला बाजार  पोळीचा लाडू असच काहीसं हातावर ठेवायची आई .. सई पाहतही नाही अशा खाण्याकडे आता .. ह्या सवयी तिला कुणी लावल्या ? बिस्किटं , वेफर्स नी तत्सम खाण्याने भरून वाहतायत डबे आता ..

आत्ता आठवतय कि ...आत्याचं घर किती लांबं होतं पण चालतच न्यायचे आजोबा .. त्यांचं काय नातीवर प्रेम का नव्हतं ? पण चालणं हेच फार स्वाभाविक होतं.....

पुढे सायकल हातात आल्यावर चालत जायला कंटाळायला लागले मी तेंव्हा आज्जी म्हणत असे .. घोडं दिसलं कि पायी चालू वाटत नाही !!!

सुरवात सारी इथुनच झाली का ? पुढे शिक्षण झालं ,  नोकरी लागली तशा मागण्या वाढल्या माझ्या .. ड्रेसचा कप्पा वाढला ..चपलेचे जोड वाढले ..

अगं राखून ठेव पैसा हाताशी , आहे म्हणून संपवू नये .. आई म्हणायची तेंव्हा हो गं ...म्हणत फणकार्याने निघून जायचे मी ही ..

यथावकाश लग्न झालं , नवरा IT तला .. सहा आकडी पगार त्याचा .. मोठ्ठं घर हवं म्हणून कर्ज काढलं तेंव्हाही आजोबा म्हणाले होते .. अगं प्रायव्हेट नोकर्या तुमच्या , एवढालं ते लोन काढताय .. अंथरूण पाहून पाय पसरावेत बयो !

पण कुठेसं ऐकलेला डायलाँग घोळवायचे मी तेंव्हा .. तोकडं पडलं तर अंथरूण वाढवा ना .. सदा पायच का आखडून घ्यायचे आपण  ?

स्टिलची ताटं नको म्हणून डिनर सेट आणले ..एकेक करत नाँनस्टिकच्या भांड्यांचे सेट झाले ..  फ्रिज , टिव्ही लहान वाटायला लागला .. सोफ्यावाचून हाँल सुनासूना भासायला लागला ... दिरानं अन् ताईने घेतली गाडी तशी मग आपणही घेतलीच .. बसचा प्रवास अगदिच दुर्मिळ झाला मग .. उपभोगत आलो सारं .. आमचा स्तर आम्हीच वाढवला ..

मागची पिढी  खर्चिक म्हणतच आली आम्हांला ..

 कोकणातल्या मूळ गावी जायला लाल डब्ब्याखेरीज दुसरी सोय नव्हती .. गाडी अजून घेतलेली नव्हती .. तेंव्हा जाणारच नाही म्हंटलं नाही पण  तरी नाकं मुरडायचेच मी जाताना .. सासरे म्हणतच मग .. तुम्हांला थेट गाडी आहे आता किती बरय .. आम्ही   ST , बोट , पायी असं करीत करीत पोहोचत असू  कित्येक तासांनी .. मला एशियाड हवीशी वाटे .. तसचं लेकीला विमान हवं आहे आता ....

आपल्याच विचारांची धारा पुढे चालवतेय लेक .. काय ओरडणार आहोत आपण तिला ..

असेच विचार करता करता कधीतरी झोप लागली .. दुसर्या दिवशी रविवार .. जरासं आळसावतच चारू बसली तोवर कामवाल्या मावशी आल्या ..

चांगल्या कपबशा नि चांगल्या चांगल्या बेडशिट्स नि भरलेली पिशवी त्यांच्या हातात .. म्हंटलं काय हो हे .. आत्ता कसली केलीत खरेदी .. तर म्हणाल्या .. अहो खालच्या मजल्यावरच्या ताईंनी दिलं .. जास्तीचं सामान सगळं काढून टाकून गरजेपूरतच ठेवायचं ठरवलय त्यांनी म्हणे  ..

खालच्या ताई म्हणजे चारूची मैत्रिणच मेधा .. चारूला हे समजेना तेंव्हा तिने मेधाला फोन लावला ..

"अगं मिनिमलीझम च्या मुव्हमेंट बद्दल वाचलं मधे नेटवर .. म्हणजे आवश्यक त्या वस्तूंचाच फक्त संचय करायचा .. अनावश्यक फाफटपसारा टाळायचा .. काय काय उगाचच जमवत राहतो आपण .. मला फारच पटलं ते .. म्हणून ठरवलय जमेल तितकं करूया .. त्याची ही सुरवात .. "

कुठेतरी उत्तर मिळाल्यासारखं वाटलं चारू ला .. आज रविवार आहेच तर आपणही आज हे निवांत वाचूया .. आणि बघुया आपल्याला पटतय अन् जमतय  किती नि कसं .. असं ठरवत ती स्वयंपाकघराकडे वळली ..

तशी मावशी म्हणाल्या ..बरं झालं कि हो , खालच्या ताईंनी कपबश्या दिल्या ते .. पोरांना आता स्टिलचं भांडं चालत नाही .. रंगीत डिझाईन चा कपच लागतो .. आम्ही तर करवंटीतून प्यायचो चहा  .. पण तक्रार नाही केली बघा कधी .. काय करावं ..

जनरीतच आहे झालं  .. घोडं दिसलं कि चालावं वाटत न्हाई माणसाला .. !!!

🎯

Two day International Conference

INTERNATIONAL CONFERENCE ON REGIONAL CINEMA OF INDIA

Type: 
Conference
Date: 
September 20, 2019 to September 21, 2019
Location: 
India
Subject Fields: 
Cultural History / Studies, Digital Humanities, Film and Film History, Humanities, Literature

/www.manishkumarmishra.com 

Regional Cinema Of India / भारत का क्षेत्रीय सिनेमा

Like many other marvels of science and technology, cinema came to India from the West. After railway and postal service, cinema became the major unifying factor that bound together the people of different languages, faiths, traditions and cultures living across the length and breadth of Indian subcontinent. The first Indian cinema Raja Harishchandra produced by Dadasaheb Phalke in 1913 was a silent movie based on Indian mythology. Its lack of sound was a boon in disguise as the visual language of cinema transcended the barriers of spoken language and built the bridges of understanding across India. For the next two decades, mythological films dominated the Indian cinema. In 1931 the first Indian talkie Alam Ara was released which changed the Indian film industry forever. With sound came the music and it further popularized cinema among Indian public. However, now language too became a significant factor in the success of a film. The literary masterpieces in various languages such as Devdas (1935) in Bengali were adapted to the silver screen enriching cinema with mesmerizing dialogues and enchanting songs. It also widened the scope of Indian cinema as now films started to be made in various languages, prominent among them being Hindi, Bengali, Marathi and Tamil. Later on other Indian languages too produced their own films focusing on their characteristic literary and cultural heritage, social issues and local colours. Thus along with the mainstream Hindi cinema called Bollywood, regional cinema in various Indian languages beautified the rainbow of Indian cinema with various distinctive colours.


Today India tops the world in the total number of films made per year. Apart from the blockbuster Bollywood films belonging to the ‘100 Crore Club’, the small budget regional films too make a good business in their respective areas. The advancement of digital technology plus the availability of open platforms like YouTube on internet have given much scope to the local talent and thereby has eliminated the eliticism in cinema. Thus today regional Indian cinema has become truly eclectic and democratic reflecting joys and sorrows, aspirations and frustrations of millions of people belonging to the different walks of life. However, a very little academic attention is paid to these records of life. This indifference of academia may push these first-hand subaltern experiences to the obliviousness which if preserved can provide significant primary data for research on India in humanities and social sciences in future. So the present attempt is aimed at documentation of various aspects of regional Indian cinema during the last 100 odd years.

The research papers are invited on the following topics:


  • History of regional cinema in various Indian languages
  • Major themes explored in regional cinema in various languages
  • Major genres used in regional cinema in various languages
  • Superstars of regional Indian cinema (like Rajinikanth in Tollywood)
  • Important film makers in various languages
  • Adaptation of regional language literature to the films (like Shyam chi Aai)
  • Use of folk art forms in regional Indian cinema (like Tamaashaa in Marathi cinema)
  • Music in regional Indian cinema
  • Dance and choreography in regional Indian cinema
  • Distinctive acting styles in regional Indian cinema
  • Production techniques used in regional Indian cinema
  • Popularity of regional Indian cinema
  • Challenges faced by regional Indian cinema
  • Study of blockbuster regional films (like Sairaat in Marathi)
  • Study of parallel/ art films in regional languages (like Kaadu in Kannada)
  • Remakes of English or Hindi or foreign language films in regional Indian languages
  • Remakes of regional Indian cinema in other languages including Hindi (such as Bodyguard)
  • Impact of cable TV, internet and social media on regional cinema
  • Business models of regional Indian cinema

Contact Info: 
Dr. Manish kumar Mishra 
Contact Email: 

Thursday 14 March 2019

जाणता राजा

https://youtu.be/--y1bPjUBCc

सुरेश भट यांच्या स्मरणार्थ

आज कविवर्य, गझलकार सुरेश भट यांची पुण्यतिथी अशा या महान शब्दप्रभूंना भावपूर्ण आदरांजली.💐🙏🙏

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते-
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते !

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या,
पाऊल कधी वार्‍याचे माघारी वळले होते ?

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी..
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते !

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही-
मी रंग तुझ्या स्वप्‍नांचे अश्रूंत मिसळले होते

घर माझे शोधाया मी वार्‍यावर वणवण केली-
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते !

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो..
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते !
              ✍सुरेश भट